मुसलमानांच्या विरोधानंतर ब्रिटनमधील शाळेत महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणारा शिक्षक निलंबित !

विरोधानंतर मुख्याध्यपकांची क्षमायाचना !

मुसलमान त्यांच्या धार्मिक भावनांविषयी सतर्क असतात आणि त्वरित त्याचा अवमान करणार्‍यांचा विरोध करतात, तर बहुतांश जन्महिंदु अशा घटनांविषयी निष्क्रीय असतात आणि त्यांच्यात धर्माभिमानही नसतो !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या वेस्ट यॉर्कशायर येथील बॅटले ग्रामर स्कूलमध्ये शार्ली हेब्दो या मासिकात प्रसिद्ध झालेले महंमद पैगंबर यांचे चित्र असलेला अंक दाखवण्यात आला. त्यानंतर मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. यामुळे मुख्याध्यापकांनी क्षमा मागितली आहे. धार्मिक शिक्षण देणार्‍या या शिक्षकाने हे चित्र दाखवले होते. त्यानेही मुसलमानांची क्षमा मागितली आहे. शाळेने त्याला निलंबित केले आहे. मुख्याध्यापकांनी ‘धार्मिक शिक्षण देणार्‍या अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करण्यात येईल’, असेही म्हटले आहे. काही मासांपूर्वीच अशा प्रकारे चित्र दाखवल्यावरून फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा धर्मांध विद्यार्थ्याकडून शाळेत शिरच्छेद करण्यात आला होता.

दुसरीकडे शिक्षण विभागाने मात्र मुसलमानांच्या निदर्शनांचा विरोध करतांना ‘कोरोनाच्या काळात अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन स्वीकारार्ह नाही’, असे म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी, ‘शाळेला त्याच्या अभ्यासक्रमामध्ये विविध विचार सूत्रे; मग ती आव्हात्मक असोत कि वादग्रस्त त्यांचा समावेश करण्याचे स्वातंत्र्य आहे’, असे म्हटले आहे.