उडुपी, कर्नाटक येथील थोर संत पू. गोपाळकृष्ण उपाध्ये यांचे सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘संत भेटीच्या दौर्‍यावर असणारे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांच्या विनंतीवरून उडुपी, कर्नाटक येथील थोर संत पू.  उपाध्ये यांचे १२.९.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. त्यांनी आश्रमात प्रवेश करताच आश्रमाच्या विविध भागांचे सूक्ष्म परीक्षण करून नामजपादी उपाय केले आणि साधकांसाठीही उपाय केले. त्यांच्या सहवासात असतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्येे, तसेच त्यांच्या उपायपद्धतीचे वैशिष्ट्य आणि ते साधकांवर अन् आश्रमावर उपाय करतांना देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

पू. गोपाळकृष्ण स्वामी

१. पू. गोपाळकृष्ण स्वामी यांच्या मानेची आणि हातांची विशिष्ट प्रकारे हालचाल होण्यामागील कारण

त्यांच्या सूक्ष्म देहांचा त्यांच्या स्थूल देहाशी दृढ संपर्क असल्यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहांना जाणवणारी स्पंदने त्यांच्या स्थूल देहालाही त्वरित समजतात. त्यामुळे सूक्ष्मातून जाणारा शक्तीचा प्रवाह आणि कार्यरत असणारी स्पंदने यांच्याप्रमाणे त्यांची मान आपोआप गोलाकारात फिरते आणि त्यांच्या दोन्ही हातांच्या हालचाली होतात.

२. पू. गोपाळकृष्ण स्वामीजींकडून श्री गणेश आणि देवी निर्गुण-सगुण स्तरावरील तारक किंवा मारक शक्ती प्रक्षेपित होत असतांना स्वामीजींची होणारी स्थिती

कु. मधुरा भोसले

त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रीती, अव्यक्त भाव, आनंद आणि शांती जाणवते. ते जेव्हा उपायांच्या वेळी पहातात, तेव्हा त्यांच्याकडून श्री गणेश आणि देवी यांची निर्गुण-सगुण स्तरावरील कधी मारक शक्ती, तर कधी तारक शक्ती वायूमंडलात प्रक्षेपित होते. जेव्हा त्यांच्याकडून मारक शक्ती प्रक्षेपित होते, तेव्हा त्यांची दृष्टी एका ठिकाणी स्थिर होते आणि त्यांचा तोंडवळा गंभीर होतो. जेव्हा त्यांच्याकडून तारक शक्ती प्रक्षेपित होते, तेव्हा त्यांची दृष्टी फिरत असते आणि त्यांच्या तोंडवळ्यावर बालकाप्रमाणे निरागसता आणि आनंद जाणवत असतो.

३. पू. गोपाळकृष्ण स्वामीजींकडून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण-सगुण स्तरावरील तारक किंवा मारक शक्तीमुळे होणारे परिणाम

ते जेव्हा विशिष्ट ठिकाण किंवा व्यक्ती यांच्याकडे पहातात, तेव्हा त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण-सगुण स्तरावरील मारक शक्तीमुळे स्थान किंवा व्यक्ती यांच्या ठिकाणी असणारी नकारात्मकता नष्ट होते. जेव्हा स्वामीजी विशिष्ट ठिकाण किंवा व्यक्ती यांच्याकडे पहातात, तेव्हा त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण-सगुण स्तरावरील तारक शक्तीमुळे ते स्थान किंवा व्यक्ती यांना सकारात्मक होण्यासाठी जी ऊर्जा किंवा जे घटक आवश्यक असतात, ते त्यांना मिळतात, उदा. एखाद्यात कॅल्शियमचे प्रमाण न्यून असल्यास ते वाढणे, रक्तातील उष्णता उणावणे, इच्छाशक्ती वाढणे, एखाद्या ठिकाणची त्रासदायक शक्ती नष्ट होऊन सकारात्मक शक्ती वाढणे इत्यादी.

४. पू. गोपाळकृष्ण स्वामी यांना व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी लागणार्‍या कालावधीमागील कारणे

टीप : संतांनी व्यक्तीवर उपाय करून तिच्यामध्ये भरलेली दैवी शक्ती काही काळ टिकून रहाते; परंतु व्यक्तीवर वाईट शक्तींनी आक्रमणे केल्यावर ही दैवी शक्ती क्षीण होते. त्यामुळे व्यक्तीला पुन्हा उपायांची आवश्यकता भासते.

५. पू. गोपाळकृष्ण स्वामी यांना निसर्गातील समतोल राखण्याची दुर्मिळ सिद्धी अवगत असणे

पू. गोपाळकृष्ण स्वामी यांचे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी सतत अनुसंधान असते. ते निर्गुणोपासक असल्याने त्यांचे प्रकृतीतील (निसर्गातील) पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे. ही एक प्रकारची अलौकिक सिद्धी असून तिला ‘तत्त्व सिद्धी’ म्हणतात. त्यामुळे निसर्गातील नकारात्मक ऊर्जा वाढल्यावर ते पंचमहाभूतांची ऊर्जा न्यून किंवा अधिक करून निसर्गातील समतोल राखतात. ईश्‍वराच्या कृपेमुळे ही सिद्धी त्यांना जन्मत:च अवगत झालेली आहे. त्या बळावरच ते व्यक्तीतील पंचमहाभूतांच्या नकारात्मक ऊर्जेचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करून व्यक्तीसाठी नामजपादी उपाय करतात. त्यामुळे व्यक्तींना होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होऊन त्यांचे आरोग्य सुधारते.

६. पू. गोपाळकृष्ण स्वामी यांची गुणवैशिष्ट्ये

६ अ. भाषा कळत नसूनही त्यांनी प्रेमाने आणि भावपूर्ण बोलून सर्वांना आपलेसे करून घेणे : पू. गोपाळकृष्ण स्वामी यांना हिंदीमध्ये बोलता येत नसल्यामुळे ते कन्नड भाषेतच बोलतात. आम्हाला कन्नड कळत नसूनही त्यांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटत होते; कारण ते मनापासून बोलत होते आणि त्यांच्या वाणीमध्ये चैतन्य अन् त्यांच्या शब्दांमध्ये सत्यता आणि निर्मळता जाणवत होती. ते प्रेमाने आणि भावपूर्ण बोलत असल्यामुळे ते सर्वांना आपलेसे करून टाकतात.

६ आ. पू. गोपाळकृष्ण स्वामी यांच्यामध्ये साधकांच्या कल्याणाचा भाव आणि त्यांना बरे करण्याची तीव्र तळमळ असणे : सभागृहात साधक बसलेल्या ठिकाणी जाऊन ते प्रत्येक साधकाचे सूक्ष्म परीक्षण करून त्याच्यासाठी नामजपादी उपाय करत होते. यावरून त्यांच्यामध्ये साधकांच्या कल्याणाचा भाव आणि साधकांना बरे करण्याची तीव्र तळमळ पुष्कळ प्रमाणात असल्याचे जाणवले.

६ इ. पू. गोपाळकृष्ण स्वामींमध्ये अहंकार लेशमात्रही नसल्याने त्यांच्या सत्संगात आनंद जाणवणे : ते शक्ती प्रक्षेपित करणारे संत असूनही त्यांच्याकडे पाहून आणि त्यांची मधुर वाणी ऐकून पुष्कळ आनंद जाणवतो. याचे कारण शोधल्यावर ‘त्यांच्यामध्ये लेशमात्रही अहंकार जाणवत नाही’, हे असल्याचे लक्षात आले. अहंकार नसल्यामुळे त्यांना देवीची निर्गुण शक्ती मार्गदर्शन करते आणि ते वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करत असूनही त्यांच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींना प्रतिआक्रमण करता येत नाही. त्यांचा साधेपणा आणि सहजता यांतून त्यांची अहंशून्यस्थिती जाणवते.

६ ई. परिपूर्ण आणि परिणामकारक उपाय करण्याची विलक्षण क्षमता असणे : ते एखाद्या व्यक्तीवर किंवा वास्तूवर उपाय करतांना ज्या ठिकाणाहून चांगली स्पंदने येतात, ते स्थान शक्ती देण्यासाठी निवडतात. यावरून त्यांच्यातील परिपूर्ण आणि परिणामकारक उपाय करण्याची विलक्षण क्षमता लक्षात येते.

६ उ. ईश्‍वराची निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही स्तरांवरील तत्त्वे धारण अन् प्रक्षेपण करण्याची अलौकिक क्षमता असणे : जेव्हा व्यक्ती किंवा स्थान यांच्यावर निर्गुण तत्त्वाच्या उपायांची आवश्यकता असते, तेव्हा त्यांच्याकडून ईश्‍वराची निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती प्रवाहित होते. जेव्हा व्यक्ती किंवा स्थान यांच्यावर निर्गुण तत्त्वाच्या उपायांची आवश्यकता असते, तेव्हा त्यांच्याकडून ईश्‍वराची सगुण-निर्गुण स्तरावरील शक्ती विविध देवतांच्या तत्त्वांच्या रूपाने प्रवाहित होते. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ईश्‍वराची निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही स्तरांवरील तत्त्वे धारण अन् प्रक्षेपण करण्याची अलौकिक क्षमता असल्याचे सुस्पष्ट होते.

६ ऊ. ध्यानमार्गी आणि व्यष्टी प्रकृती असणे :  ते ध्यानमार्गी असून त्यांची प्रकृती व्यष्टी आहे, तरीही ते समष्टीच्या कल्याणासाठी साधकांवर निरपेक्ष भावाने नामजपादी उपाय करून अप्रत्यक्षरित्या समष्टी साधना करतात.

कृतज्ञता

‘हे भगवंता, तुझ्या कृपेमुळे आम्हाला पू. गोपाळकृष्ण स्वामी यांचे दर्शन, मार्गदर्शन आणि उपाय यांचा लाभ होऊन त्यांचे भरभरून कृपाशीर्वाद लाभले. यासाठी आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत. ‘आम्हा साधकांवर अशीच संतांची आणि गुरूंची कृपा अखंड राहू दे’, अशी तुझ्या पावन चरणी प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक