या दाव्यात तथ्य असेल, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने नमते घेतल्याचे दाखवले असले, तरी त्याने वेगळ्या प्रकारे भारतावर आघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, हे यातून दिसून येते ! अशा चीनला अद्दल घडवल्याविना पर्याय नाही !
नवी देहली – चिनी हॅकर्सने सायबर आक्रमण करून मुंबईचा वीजपुरवठा खंडित केल्याचे वृत्त उघड झाल्यानंतर आता चिनी हॅकर्स गटाने कोरोनावरील लस बनवणार्या २ भारतीय आस्थापनांवरही सायबर आक्रमण केल्याचे समोर आले आहे. काही आठवड्यांपूर्वीच हे आक्रमण करण्यात आले.
चीनी हैकर्स भारत के सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, पतंजलि और ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज को निशाना बना रहे हैं.https://t.co/9zapioamz0
— @HindiNews18 (@HindiNews18) March 1, 2021
Beijing dismisses alleged Chinese hacking of Indian vaccine makers https://t.co/PzyKn2DnYI pic.twitter.com/dkfg1DAFtc
— Reuters (@Reuters) March 2, 2021
चीनमधील आस्थापन ‘स्टोन पांडा’ याने भारतीय आस्थापन ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ यांच्या आयटी सिस्टिममधील त्रुटी शोधून हे आक्रमण केले. सिंगापूरच्या ‘सायफर्मा’ या सायबर गुप्तचर आस्थापनाने हा दावा केला आहे; मात्र सिरम आणि भारत बायोटेक यांनी याविषयी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.