तुर्कस्तानमधील जिहादी संघटना भारताच्या विरोधात नेपाळमधील इस्लामी संस्थेच्या माध्यमातून करत आहे जिहादचा प्रसार !

नेपाळच्या भारतालगतच्या सीमेवर जिहाद पसरवण्याचा प्रयत्न !

जिहादी संघटना आणि आतंकवादी भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, हे भारतातील धर्मनिरेपक्ष हिंदू लक्षात घेतील तो सुदिन ! या जिहाद्यांचे षडयंत्र नष्ट करण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे !

नवी देहली – अल्-कायदाशी संबंधित तुर्कस्तानमधील ‘दी फाऊंडेशन ऑफ ह्युमन राइट्स अँड फ्रीडम अँड ह्युमॅनिटेरियन रिलीफ’ या संघटनेने दक्षिण आशियामध्ये जिहादचा प्रसार करण्यासाठी नेपाळमधील इस्लामी संस्था ‘इस्लामी संघ नेपाळ’शी (आय.एस्.एन्.’शी) संधान साधले आहे. या संघटनेने नेपाळच्या सीमा भारताशी लागत आहे त्या भागात जिहादी कार्य चालू केले आहे. या संघटनेकडून ‘इस्लामी संघ नेपाळ’ला अर्थपुरवठा केला जात आहे. ‘आय.एस्.एन्. जिहादी कारवाया करत आहे’, याविषयी भारतीय गुप्तचरांनी यापूर्वीच सतर्क केले होते. (सतर्क करूनही भारतीय सुरक्षायंत्रणांनी या जिहादी संघटनेच्या विरोधात काय कारवाई केली, हे सांगणे आवश्यक ! – संपादक)

तुर्कीच्या संघटनेला संयुक्त राष्ट्रांनी ‘शस्त्रांची तस्करी करणारी संघटना’ म्हणून यापूर्वीच घोषित केले आहे. सीरियामध्ये या संघटनेने आतंकवाद्यांना समर्थन दिले होते. तुर्कस्तानचे सरकार या संघटनेला पाठीशी घालत असल्याने तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता या संघटनेने नेपाळच्या लुम्बिनी आणि त्याच्या शेजारील भागात मशीद, मदरसे, इस्लामी सेंटर आणि अनाथालये उघडली आहेत.