ठाणे येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

रिंकू शर्मा हत्या प्रकरण

ठाणे येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप पळसुले यांना निवेदन देतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी

ठाणे, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – देहली शहरातील हिंदुत्वनिष्ठ रिंकू शर्मा यांची क्रूरपणे हत्या करणाार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन १७ फेब्रुवारी या दिवशी ठाणे येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप पळसुले यांना देण्यात आले. या वेळी हिंदु महासभेचे श्री. राकेश हिंदुस्थानी आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी अधिवक्ता रणधीर सपकाळ, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलास जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. उमेश तिवारी, भाजपचे माजी कल्याण शहर उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके हिंदुत्वनिष्ठ श्री. विजय ठाकरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.