भिवंडी येथे वीजचोरी प्रकरणी २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

कठोर शिक्षा होत नसल्यामुळे धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नाही !

ठाणे, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – भिवंडी शहरात वीजपुरवठा करणार्‍या टोरंट पॉवर या वीज वितरण करणार्‍या आस्थापनाने वीजचोरी करणार्‍या ग्राहकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. वीज मीटरचे सील तोडून कॉपर लिंक लावून वीज चोरी करणार्‍या अरशद मोहंमद हसन अंसारी आणि मोहंमद शाहिद मोहंमद हसन अंसारी या दोघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी सुमारे ९ सहस्र ४०४ युनिटची १ लाख ६७ सहस्र ९३७ रुपयांची वीजचोरी केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.