देवी सीतामाता यांचा अवमान करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपये देऊ !  

तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांची घोषणा !

तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – देवी सीतामाता यांच्याविषयी अपशब्द काढणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर भाजपने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी ‘बॅनर्जी यांच्यावर कारवाई झाली नाही, तर त्यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येईल’, अशी घोषणा केली आहे. महंत परमहंस दास यांनी बॅनर्जी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘राजकारणासाठी देवतांचा अपमान केला जात आहे, हे तात्काळ रोखले गेले पाहिजे’, असेही दास यांनी म्हटले.