
लंडन – ब्रिटनचे नवे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या नवीन मंत्रीमंडळाची स्थापना केली. बर्नहॅम यांनी त्यांच्या नवीन मंत्रीमंडळात अनेक जुन्या मंत्र्यांना कायम ठेवले आहे. यांमध्ये भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांचा समावेश आहे. कनिष्क नारायण यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) मंत्री बनवण्यात आले आहे, तर लिसा नंदी यांना संस्कृती मंत्रीपदावर कायम ठेवण्यात आले आहे.
Two Indian-origin MPs join PM Andy Burnham’s UK Cabinet! 🇬🇧🇮🇳
🔹 Kanishka Narayan (born in Muzaffarpur, Bihar) appointed as AI Minister.
🔹 Lisa Nandy (daughter of Kolkata-born Deepak Nandy) appointed as Culture Secretary.
A big moment for representation in British politics!… pic.twitter.com/zy1L6ju0wZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2026
१. कनिष्क नारायण यांचा जन्म बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झाला होता. १२ वर्षांचे असतांना ते त्यांच्या कुटुंबासह ब्रिटनमधील कार्डिफ येथे स्थलांतरित झाले होते.
२. राजकारणात येण्यापूर्वी कनिष्क नारायण यांनी तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रांत काम केले होते. वर्ष २०२५ मध्ये कीर स्टार्मर सरकारने त्यांना ‘एआय’ आणि ‘ऑनलाइन’ सुरक्षामंत्री बनवले होते.
३. लिसा नंदी यांना अँडी बर्नहॅम यांनी त्यांच्या नवीन मंत्रीमंडळात संस्कृती मंत्रीपदावर कायम ठेवले आहे. लिसा यांचा जन्म मँचेस्टर येथे झाला. त्यांचे वडील दीपक नंदी कोलकाता येथील रहिवासी होते, तर त्यांची आई लुईस बायर्स ब्रिटनच्या रहिवासी आहेत.
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !