दोषी अब्दुल हमीद याची फाशीची शिक्षा आणि दोष रहित
पुन्हा चालणार खटला

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने वर्ष १९९६ मधील राजस्थानच्या समलेटी येथील बसगाडीत झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणात वर्ष २०१९ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलेल्या डॉ. अब्दुल हमीद याची फाशीची शिक्षा आणि दोषसिद्धी रहित केली आहे. न्यायालयाने म्हटले की, खटल्याच्या वेळी त्यांना योग्य कायदेशीर साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या निष्पक्ष सुनावणीच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले.
जलद गती न्यायालयाची स्थापना करण्याचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने आता राजस्थान उच्च न्यायालयाला निर्देश दिले आहेत की, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष जलद गती न्यायालय स्थापन केले जावे. हे न्यायालय सर्व पुराव्यांचे नव्याने आणि स्वतंत्रपणे मूल्यमापन करून पुन्हा खटला चालवेल.
वर्ष १९९६ मध्ये उत्तरप्रदेशातील आगरा येथून राजस्थानच्या बिकानेरला जाणार्या एका बसमध्ये राजस्थानच्या समलेटी गावाजवळ बाँबस्फोट झाला होता. या स्फोटात १४ जण ठार आणि ३७ जण घायाळ झाले होते.
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री