रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आलेली अनुभूती

सनातन आश्रम, रामनाथी

‘२८.१०.२०२० या दिवशी रात्री मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा १० मिनिटे माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रू येऊन  मी १ घंटा त्याच आनंदात होते. तेव्हा मला ‘ध्यानमंदिरात पुष्कळ प्रकाश पडला आहे’, असे जाणवत होते. मला ध्यानमंदिरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

​गुरुकृपेने मला आलेली ही अनुभूती मी त्यांच्या कोमल चरणी अर्पण करते.’

– सौ. पार्वती केरेमणी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२०)