मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२९.१२.२०२०) या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची कन्या सौ. सायली करंदीकर आणि सौ. समृद्धी राऊत यांनी दिलेली कविता येथे देत आहोत.
ध्येय मनी धरूनी स्वराज्य स्थापनेचे ।
घडवले शिवबाला जिजाऊ मातेने ।
तसेच ध्येय देऊनी ईश्वरप्राप्तीचे ।
जन्माला घातले आम्हाला महालक्ष्मीने (टीप १) ॥ १ ॥
गुरूंची शिकवण आत्मसात करण्या ।
शिकवी आई चिकाटीने अन् सांगे आम्हा (टीप २) ।
मन गुरूंचे जिंकण्याचे ध्येय धरा ।
सांगतसे ती आम्हा सर्वांना ॥ २ ॥
आकाशी झेप घेतांना चिमणीचे ।
जसे असते लक्ष पिल्लांकडे ।
त्याचप्रमाणे भ्रमण करता देशभरात ।
आईही असे आम्हा लेकरांसाठी दक्ष ॥ ३ ॥
आईच्या (सद्गुरु काकूंच्या) शब्दाशब्दांत असे भगवंताचे दर्शन जणू ।
सद्गुरु काकू सांगती सर्वांना देवाचे नाम घ्या श्वासागणिक ।
मग देव करील आपल्यावर कृपा क्षणोक्षणी ।
याच एका वाक्याने साधक जाती भारावुनी ।
वाढत जाई त्यांची श्रद्धा सद्गुरुचरणी ॥ ४ ॥
देवा, खरेच धन्य झालो आम्ही लेकरे ।
खरोखर ‘आई हे देवाचे रूप’ हे काव्य प्रत्यक्ष अनुभवूनी ।
सद्गुरु आणि आई आमच्यासाठी काकू केवळ तुम्हीच ।
एकच प्रार्थना करतो गुरुचरणी ।
आजवर तुम्ही केलेले संस्कार कायम ध्यानात राहू देत ।
सांगितलेल्याचे आज्ञापालन करून तुझ्या चरणी येता येऊ देत ।
आई (सद्गुरु काकू), प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्या चरणी आज करतो ।
आध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचा आशीर्वाद सतत राहू देत ॥ ५ ॥
टीप १ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
टीप २ – सायली आणि शायरी (आताची सौ. समृद्धी राऊत)
– तुमच्या,
सौ. सायली करंदीकर ( श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची कन्या) आणि सौ. समृद्धी राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |