नागपूर येथे ५० लाख रुपये हुंड्याच्या मागणीला कंटाळून विवाहित आधुनिक वैद्य महिलेची आत्महत्या

नागपूर – येथील नरेंद्र नगरमधील उपेंद्र अपार्टमेंट येथे रहाणार्‍या आधुनिक वैद्य रुची रेवतकर यांनी ५० लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून २४ डिसेंबर या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचे पती मंगेश रेवतकर हेही आधुनिक वैद्य आहेत. आधुनिक वैद्य मंगेश रेवतकर हे रुची यांना माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी सतत तिचा छळ करत होते. स्वतःवर झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती रुची यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेवली होती. या घटनेनंतर रुची यांची आई अल्का कवडे यांनी पोलीस ठाण्यात हु़ंडाबळीची तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करत मंगेश यांना अटक करण्यात आली आहे.