इंडोनेशियामध्ये कोरोनावरील चिनी लसीला हलाल प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता

आता कोरोना लसीलाही हलाल प्रमाणपत्र म्हणजे कट्टरतेचा अतिरेकच होय ! याविरोधात तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ? हिंदूंनी त्यांच्या धर्मशास्त्रानुसार लसीची मागणी केली असती, तर हेच पुरो(अधो)गामी त्यांच्यावर तुटून पडले असते !

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशिया चीनच्या सिनोवॅक बायोटेककडून विकसित करण्यात आलेल्या प्रायोगिक कोरोना लसीला हलाल प्रमाणपत्र देण्याची शक्यता आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये असे घडल्यास तो पहिला मुसलमानबहुल देश असेल.

(सौजन्य : झी न्यूज)

चीनच्या लसीचे १ कोटी डोस इंडोनेशियामध्ये पोचले आहेत.

इंडोनेशियाचे मनुष्यबळ विकास आणि संस्कृती मंत्री मुहाजिर एफेंदी यांनी सांगितले की, ‘इंडोनेशियाई उलेमा काऊंसिल’कडून याविषयीचाअभ्यास करण्यात आला आहे. फतवा आणि हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी या काऊंसिलकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.