उतारवयात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकून स्वतःत पालट घडवणारे श्री. पुंडलिक माळी (वय ७० वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. पुंडलिक माळी यांचा उद्या रामनवमीला (६.४.२०२५ या दिवशी) तिथीनुसार वाढदिवस आहे. रामनाथी आश्रमात आल्यापासून त्यांच्यात बरेच पालट झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेले त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.

श्री. पुंडलिक माळी

श्री. पुंडलिक माळी यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !

१. सेवा, नामजप आणि दैनंदिनी लिखाण यांत नियमितता असणे  

‘आमचे बाबा (श्री. पुंडलिक माळी) आजारी असतांनाही शक्य तेवढा प्रयत्न करून मंत्रपठणाची सेवा करून अन्य सेवाही करतात. ते नियमित आणि ठरलेल्या वेळेत ध्यानमंदिरात बसून ३ ते ४ घंटे नामजप करतात. आश्रमात आल्यावर ते स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकले. त्यानंतर ते सहजतेने आणि नियमितपणे दिवसभरात केलेल्या सेवांची दैनंदिनीत नोंद करतात.

सौ. विमल माळी

२. श्री. माळी यांच्या पित्ताशयाचे शस्त्रकर्म असतांना त्यांनी शांत आणि स्थिर राहून सतत नामजप करणे  

ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या पित्ताशयाचे शस्त्रकर्म झाले. त्या दिवशी सकाळपासून शस्त्रकर्म करण्यासाठी जाईपर्यंत त्यांना कसलाच ताण आला नाही आणि भीतीही वाटली नाही. त्यांनी सतत आणि सहजपणे नामजप केला, तसेच शस्त्रकर्म झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी मिळेपर्यंत त्यांनी सतत नामजप केला. त्यामुळे ते लवकर बरे झाले. त्या परिस्थितीतही ते शांत आणि स्थिर होते.

सुश्री (कु.) कुशावर्ता माळी

३. अनावश्यक बोलणे न्यून होणे  

ते एका सहकारी संस्थेत व्यवस्थापक होते. तिथे कामगार आणि इतर यांच्यावर रागावणे, अनावश्यक बोलणे, घरी आल्यावर घरच्यांवर चिडचिड करणे इत्यादी स्वभावदोष त्यांच्यात होते. आता ते शांत रहातात आणि त्यांचे अनावश्यक बोलणेही उणावले आहे.

४. स्वत:च्या मतावर ठाम रहाणे उणावणे  

पूर्वी ते स्वत:च्या मतावर ठाम रहात असत. आता आम्ही सांगितलेले ते तत्परतेने आणि मनापासून ऐकतात. स्वत:चे मत व्यक्त न करता ते आम्ही सांगितल्याप्रमाणे तत्परतेने कृती करतात.

कु. संध्या माळी

५. इतरांना विचारून कृती करणे  

पूर्वी बाबांमध्ये ‘बाहेरगावी जातांना घरी न सांगणे, परस्पर कृती करणे’ इत्यादी स्वभावदोष होते. या स्वभावदोषांमध्ये आश्रमात आल्यावर ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलना’ची प्रक्रिया शिकल्यामुळे त्यांच्यात ५० ते ६० टक्के पालट जाणवतो. आता ते शांत रहातात आणि कुठलीही गोष्ट कुटुंबियांना विचारून करतात.

६. परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करणे 

बाबांनी अत्यंत अल्प कालावधीत आश्रमजीवन आणि तेथील कार्यपद्धती शिकून घेतल्या. ती स्वीकारण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता आणि साष्टांग नमस्कार !

– सौ. विमल माळी (श्री. पुंडलिक माळी यांच्या पत्नी, वय ६७ वर्षे), सुश्री (कु.) कुशावर्ता माळी (थोरली मुलगी), सुश्री (कु.) संध्या माळी (धाकटी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२५)