दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या कुटुंबाकडून धर्मांतरासाठी छळ ! – वाजिद खान यांच्या पारशी पत्नीचा आरोप

वाजिद खान यांच्या पत्नीकडून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन

स्वतःला निधर्मीवादी म्हणवून घेणारी हिंदी चित्रपटसृष्टी आता एका धर्मांध कुटुंबाच्या छळाने पीडित अल्पसंख्यांक पारशी महिलेच्या मागे उभी रहाणार का कि त्यांचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देणार ?

मुंबई – साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची  पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे. त्यांनी याविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी विवाहपूर्वी १० वर्षांपासून वाजिद यांच्याशी संबंध होते. विवाहानंतर त्यांच्या जीवनात झालेल्या पालटाविषयी माहिती दिली आहे.

कमलरुख यांनी पुढे म्हटले आहे,

१. ‘मी पारशी आहे आणि वाजिद मुसलमान होते. महाविद्यालयापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. विशेष विवाह कायद्यांतर्गत आमचे लग्न झाले. त्यामुळे सध्या धर्म परिवर्तन कायद्यासंदर्भात चालू असलेली चर्चा माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. मला आंतरजातीय विवाहाविषयीचा माझा अनुभव सांगायचा आहे. आजच्या युगातही एखाद्या स्त्रीला धर्माच्या नावाखाली भेदभाव आणि दु:ख सहन करावे लागते, ही लज्जास्पद आणि डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट आहे.

२. नीतीमूल्यांविषयी लोकशाहीच्या वातावरणात माझी जडणघडण झाली. विचारांच्या स्वातंत्र्यास प्रोत्साहित केले गेले आणि विचार करून केलेली चर्चा मान्य होती. सर्व स्तरांवरील शिक्षणास प्रोत्साहित केले गेले; मात्र विवाहानंतर हेच स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही मूल्यव्यवस्था ही माझ्या पतीच्या कुटुंबासाठी सर्वांत मोठी समस्या होती. त्यांना एक सुशिक्षित, स्वत:ची वेगळी विचारसरणी असलेली, स्वतंत्र स्त्री नको होती. धर्मांतर करण्याला माझा विरोध होता आणि त्यामुळे पती-पत्नी म्हणून आमचे नाते संपुष्टात आले. धर्मांतर करून त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी झुकण्यास माझा स्वाभिमान नकार देत होता.

कंगणा राणावत यांचा पंतप्रधान कार्यालयाला प्रश्‍न !
अल्पसंख्यांक पारशांचे आपण कसे संरक्षण करत आहोत ?

अभिनेत्री कंगणा राणावत यांनी कमलरुख यांच्या पोस्टवरून ट्वीट करत पंतप्रधान कार्यालयाला प्रश्‍न विचारले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, कमलरुख माझ्या मित्राची विधवा पत्नी आणि एक पारशी महिला आहे. तिला तिचे सासरचे कुटुंब धर्मांतरासाठी त्रास देत आहे.

मी पंतप्रधान कार्यालयाला विचारू इच्छिते की, जे अल्पसंख्यांक असल्याचे नाटक करत नाहीत, कुणाचा शिरच्छेद करत नाहीत, दंगली आणि धर्मांतर करत नाहीत, त्यांचे संरक्षण आपण कसे करत आहोत ?आधीच परशांची संख्या न्यून होत आहे. जे सर्वाधिक नाटक करतात, त्यांनाच अधिक लाभ मिळतात; मात्र जे योग्य आहेत आणि देखभाल करण्यायोग्य आहेत, त्यांना काहीच मिळत नाही. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.