कर्नाटक सरकारकडून ‘कर्नाटक वीरशैव-लिंगायत निगम’साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यात ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ‘कर्नाटक वीरशैव-लिंगायत निगम’ची स्थापना करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी या निगमची स्थापना करण्याची घोषणा केली होती. कर्नाटकमध्ये या समाजातील लोक मोठ्या संख्येने आहेत. या निगमची स्थापना कंपनी अधिनियम-२०१३ च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.