समाजाला आणि पर्यायाने देशाला हानीकारक ‘झुरळां’कडे देशवासियांनी दुर्लक्ष केल्यावर त्यांच्या दृष्टीत पुन्हा येण्यासाठीची धडपड मागील काही दिवसांपासून देहलीतील जंतरमंतर येथे चालू आहे. सरन्यायाधिशांच्या वक्तव्याने अल्पावधीत प्रसिद्धी पावलेल्या झुरळांच्या पक्षाची ‘नीट’ प्रकरणाआडून अस्तित्वासाठी चलबिचल चालू आहे. अभिजीत दीपके यांच्या पुढाकाराने देहलीतील जंतरमंतर येथे आंदोलन चालू झाले. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राची मागणी या आंदोलनातून केली जात आहे. आंदोलन चालू करणार्या ‘कॉक्रोच जनता पक्षा’ला समोरून आणि मागून अनेकांनी पाठिंबा दिला. काहींनी मौन बाळगले, तर काहींनी दुर्लक्ष केले. २२ कोटी इतके अनुयायी असलेल्या या आंदोलनाला २ सहस्रांचीही उपस्थिती लाभली नाही. त्यामुळे आंदोलन चालू ठेवण्यासाठी काहीतरी हवे, यासाठी मोठे नाव असलेली व्यक्ती यात सहभागी झाली, ती म्हणजे सोनम वांगचुक !
नायकाच्या मुखवट्यामागील देशद्रोही
सोनम वांगचुक हे अभिनेते आमीर खान यांच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाद्वारे एका वैज्ञानिकाच्या पात्रामुळे प्रसिद्धीस आले, जे नुकतेच आमीर खान यांनी नाकारले. त्यांनी चित्रपटातील पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही तोपर्यंत पर्यावरणवादी, समाजवादी, वैज्ञानिक ही विशेषणे त्यांनी लावली आणि प्रसिद्धीचा लाभ करून घेतला. जंतरमंतरवरील आंदोलनात त्यांनी उपोषण चालू करून २० दिवस झाले आहेत. न्यायालयानेही त्यांच्या प्रकृतीचा विचार करून उपोषण बंद करण्यासाठी सरकारला सुचवले आहे; परंतु अद्याप ते उपोषण करत आहेतच. यामुळे त्यांना ‘नायक’ (हिरो) ठरवले जात आहे. तसे करतांना वर्ष २००८ मध्ये गंगानदीच्या स्वच्छतेसाठी आणि रक्षणासाठी उपोषणामुळे मृत्यू पावलेले जी.डी. अगरवाल यांचा संदर्भ दिला जात आहे. अगरवाल यांच्या उपोषणाकडे त्या वेळी जसे दुर्लक्ष करण्यात आले, तसेच आता भाजप सरकार वांगचुक यांच्या संदर्भात करत आहे, असे उदाहरण दिले जात आहे.
प्रत्यक्षात वांगचुक यांनी लडाखमध्ये केलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांची देशद्रोही पार्श्वभूमी उघड झाली होती आणि त्यासाठी त्यांना अटकही झाली होती, हे विसरता कामा नये. ‘विदेशी योगदान (नियमन) कायदा, २०१० (एफ्.सी.आर्.ए.)’चे पालन न करता त्यांच्या संस्थेने विदेशी निधी स्वीकारला होता, अधिकोषातील खात्यांची संपूर्ण माहिती न देणे, त्यांच्या न्यासाच्या उत्पन्नाच्या स्रोतांविषयी माहिती न देणे आदीही कृती त्यांनी केल्या होत्या. ‘ते पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्यांच्या संपर्कात होते’, असाही आरोप झाला होता. तसेच त्यांच्या नावे ४०० ‘पेटंट’ (एकाधिकार) हे संशोधन नसून केवळ प्रयोग असल्याचे उघड झाले होते. वांगचुक यांनी लडाख येथे केलेल्या उपोषणाच्या वेळी एका स्थानिक कलाकाराच्या म्हणण्याचा संदर्भ देतांना सांगितले होते, ‘तो म्हणत होता की, चीनने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आम्ही रोखायचो. आता मात्र जर तो आला, तर आम्ही त्याला भारतात शिरण्याचे मार्ग दाखवू’, या कलाकाराला वाटते तसे होऊ नये; म्हणून सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य करण्यासाठी शत्रूदेशाला साहाय्य करण्याविषयीची चिथावणी देण्याचा उघड देशद्रोह त्यांनी केला आहे. वांगचुक यांनी शिक्षण आणि अन्य क्षेत्रांत केलेले काम चांगले आहे; म्हणून त्यांनी केलेला देशद्रोह विसरता येऊ शकत नाही. अशा चुकीच्या नायकांचा आदर्श भारतियांवर लादण्याचा प्रयत्न यशस्वी होता कामा नये.
भरकटलेला हेतू आणि दिशाहीन भविष्य
जंतरमंतरवर चालू असलेल्या या आंदोलनाच्या घडामोडी मोठ्या रोचक आहेत. सोनम वांगचुक हे उपोषण करत असले, तरी ज्यांनी आंदोलनाला आरंभ केला, त्यातील सर्वच जण काही उपोषण करत नाहीत, ते खाऊन-पिऊन आंदोलन करत आहेत, तेही वांगचुक यांच्या समोरच ! या आंदोलनात नाचगाणे होते आणि क्रिकेटसारखे खेळ खेळले जातात. ‘नीट’ पेपरफुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांविषयी कणभरही संवेदनशीलता या आंदोलनात दिसून येत नाही. त्याउलट आंदोलनकर्त्यांच्या कृती इतक्या नाट्यमय की, भविष्यात यावरच एखादे विनोदी नाटक बनू शकते.
आंदोलनात सर्रासपणे हिंदु धर्मावर, देवतांवर, साधू-संतांवर टीका होत आहे, तर दुसरीकडे अल्लाचा उल्लेख केला जात आहे. ‘नीट’ प्रकरणावरून आंदोलन चालू असतांना ते हिंदु धर्मावर येऊन पोचते कसे ? त्याविषयी त्यांना प्रश्न विचारल्यावर आंदोलनात ‘नीट’ प्रकरण, शेतकर्यांच्या मागण्या, आरक्षण, दलितांच्या समस्या सर्वांसाठी आंदोलन असल्याचे सहभागी सांगतात. आंदोलनाला पाठिंबा देणार्या एकाला ‘हिंदु संतांवर आरोप करायला तुम्ही हिंदु धर्म मानत नाही. तुमच्या आंदोलनात जिझस किंवा अल्ला यांच्या विरोधात काही ऐकायला का मिळाले नाही ?’, असा प्रश्न विचारल्यावर ‘आंदोलनाच्या विषयावर चर्चा करूया’ असे म्हणत त्याने वेळ मारून नेली.
आंदोलनाच्या स्थळी प्रत्येक दिवशी पाठिंबा देण्यासाठी येणारे किंवा सहभागी होण्यासाठी येत असलेले कथित देशहितवादी हे चिनी राजदूतांनी आयोजित केलेल्या बैठकांमधून भेटवस्तू घेऊन बाहेर पडल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली आहेत. मुळात आंदोलनाचा मुख्य उद्देश काय ? त्याची दिशा काय ? कार्यप्रणाली काय ? याविषयी ना ‘कॉक्रोच जनता पक्षा’चा दीपके यांनी स्पष्ट केले आहे, ना आंदोलनाला पाठिंबा देणार्यांना ते ठाऊक आहे ! आंदोलनाचा हेतू ठाऊक नाही, दिशा स्पष्ट नाही. त्यामुळे हे आंदोलन देशहिताचे किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचे नाहीच !
दिशा घ्या !
राहिला प्रश्न शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्याचा, तर ‘नीट’ प्रकरणानंतर जे काही पुढे आले आहे, त्यावरून ती मागणी देशातील सर्व नागरिकांची आहेच. जंतरमंतरवर चालू असलेल्या देशविरोधी आंदोलनांना देशप्रेमी भारतीय भीक घालणार नाहीत. भारतीय देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे ते ‘कॉक्रोच जनता पक्षा’च्या आंदोलनाच्या नावाखाली असलेल्या खुळचटपणाला पाठिंबा देणार नाहीत. हिंदु धर्माच्या विरोधात तेथे होत असलेल्या घोषणा आणि कथानक यांना पाठिंबा देणार नाहीत अन् ते सहनही करणार नाहीत, तसेच भारतीय समाजाला विभागण्याच्या आणि अराजक निर्माण करण्याच्या प्रयत्नाला देशप्रेमी पाठिंबा देणार नाहीत.


पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
संपादकीय : युद्धाचा उत्तरार्ध चालू !
संपादकीय : समाजवादी धर्मनिरपेक्षता !