बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करू ! – भाजपच्या बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी

भाजपने एक एक राज्यात असा कायदा करण्याऐवजी केंद्रात त्याचे सरकार असल्याने संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते. त्यासमवेत धर्मांतरविरोधी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि  समान नागरी कायदाही बनवावा, ही जुनी मागणीही तात्काळ पूर्ण करावी !

कोलकाता (बंगाल) – राज्यात वर्ष २०२१ मध्ये भाजप सत्तेत असल्यास ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करू आणि ‘लव्ह जिहाद’वर बंदी घालू, असे भाजपच्या बंगालच्या सरचिटणीस आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी म्हटले आहे. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात बंगाल सर्वांत वरच्या स्थानी आहे’, असे यापूर्वी विश्‍व हिंदु परिषदेने यापूर्वी सांगितले होते.

बंगालमध्ये मुसलमान तरुणाशी विवाह केलेल्या हिंदु तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच पीडितेच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

(सौजन्य : KolkataToday)

या घटनेत बेहला भागात एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला आणि नंतर ती गर्भवती राहिल्यावर तिची हत्या केली.