भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सद्यःस्थिती पहाता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

भावी आपत्काळात उपयुक्त होतील, अशा विविध शारीरिक कृती आतापासूनच करण्याचा सराव करावा !

यात रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणेे यांसारख्या कृती समाविष्ट असाव्यात. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम राहण्यासाठी प्रतिदिन व्यायाम (उदा. सूर्यनमस्कार घालणे, न्यूनतम १ – २ कि.मी. चालणेे), प्राणायाम, योगासने आदी करावीत !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’)