भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सद्यःस्थिती पहाता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

आरोग्य चांगले रहाण्यासाठी हे करावे !

अन्य सूत्रे . . . 

१. डासांपासून रक्षण होण्यासाठी आवश्यकतेनुसार मच्छरदाण्या खरेदी कराव्यात !

२. आधुनिक वैद्यकीय यंत्रे वा उपकरणे यांद्वारे करायचे आवश्यक ते उपचार, उदा. डोळ्यांची शस्त्रक्रिया, दंतोपचार आताच करून घ्यावेत !

३. एकूण गरजा (उदा. काही विशिष्ट पदार्थच आवडत असणे, अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे, चालत जाण्याच्या अंतरावरही दुचाकी-चारचाकी वाहन हवे असणे) अल्प करण्याची हळूहळू सवय करावी !

४. अन्न, पाणी, वीज, स्वयंपाकाचा ‘गॅस’, तसेच इतर वस्तू (उदा. गोडे तेल) काटकसरीने वापरायची सवय आतापासूनच लावावी !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’)