Gyanvapi Mathura Sambhal Dispute : काशी, मथुरा आणि संभल येथील मंदिर-मशीद वादामध्ये सर्वाेच्च न्यायालयाचा मध्यस्थीचा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी फेटाळला

न्यायालयीन लढाईनेच प्रश्न सोडवण्याविषयी दोघेही ठाम

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील काशी, मथुरा आणि संभल येथील मंदिर-मशीद वादाच्या संदर्भात हिंदु आणि मुसलमान पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाचा मधध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला आहे. हे तिन्ही वाद वाराणसीतील ज्ञानवापी, मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि संभलमधील हरिहर मंदिर यांच्याशी संबंधित आहेत.

१. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात २१ ते २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत ‘समाधान समारोह’ अंतर्गत विशेष लोक न्यायालयाचे आयोजन केले जाणार आहे. याचा उद्देश दीर्घ कायदेशीर लढाईऐवजी चर्चेद्वारे तोडगा काढणे हा आहे.

२. या उपक्रमाच्या अंतर्गत या ३ प्रकरणांच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने मध्यस्थीचा प्रस्ताव समोर ठेवला होता आणि दोन्ही पक्षांकडून सहमती मागितली होती; मात्र कोणत्याही पक्षाने यासाठी सहमती दिली नाही. न्यायालयाने हे पत्र कधी पाठवले होते, याची माहिती समोर आलेली नाही.

३. दोन्ही पक्षांनी सांगितले की, त्यांना न्यायालयातच खटला लढून निर्णय हवा आहे.