उत्तर गोवा जिल्हा न्याय दंडाधिकार्यांचे घनकचरा नियमांच्या कठोर कार्यवाहीचे आणि सखोल पडताळणीचे आदेश

पणजी १२ जुलै (वार्ता.) – कचर्याची अवैधरित्या विल्हेवाट लावल्यास कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने उत्तर गोव्याचे जिल्हा न्याय दंडाधिकारी अंकित यादव यांनी अधिकार्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ची कठोर कार्यवाही सुनिश्चित करण्यासमवेतच उघड्यावर कचरा टाकण्याच्या जागा आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे घटक यांची सखोल पडताळणी करावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या ‘घनकचरा व्यवस्थापन विशेष कक्षा’च्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतांना जिल्हा न्याय दंडाधिकार्यांनी उघड्यावर कचरा टाकणे रोखणे, देखरेख सुधारणे आणि कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन बळकट करणे यांविषयी जिल्ह्याच्या सिद्धतेचा आढावा घेतला. या बैठकीला ग्रामपंचायती, नगरपालिका, गोवा कचरा विल्हेवाट महामंडळ (वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन) आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणार्या घटकांची ओळख आणि नोंदणी, उघड्यावर कचरा टाकणे आणि अस्वच्छता पसरवणे यासंबंधीच्या तक्रारींचे निवारण; तालुकास्तरीय विशेष कक्षांनी सिद्ध केलेले पडताळणीचे वेळापत्रक आणि पंधरवड्याचा देखरेख अहवाल सादर करणे या गोष्टींचा आढावा घेण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापन नियमांची कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींच्या अधिकार्यांसाठीच्या क्षमता-बांधणी कार्यक्रमांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा न्याय दंडाधिकार्यांनी सर्व विभाग, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती आणि तालुकास्तरीय विशेष कक्षांना निर्देश दिले की, त्यांनी आंतरविभागीय समन्वय बळकट करावा, उघड्यावर कचरा टाकण्याच्या संवेदनशील ठिकाणांची आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणार्या घटकांची नियमित पडताळणी करावी; वेळेवर अहवाल सादर करावेत अन् सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ची कठोर कार्यवाही करावी.
हे निर्देश वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करणे, अवैधरित्या कचरा टाकण्यास आळा घालणे आणि संपूर्ण उत्तर गोव्यात पर्यावरणाची स्वच्छता सुधारणे, या उद्देशाने देण्यात आले आहेत.
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
दिवे घाट (पुणे) येथे वारीच्या काळात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन !
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू !