Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस

विशेष अन्वेषण पथकाकडून अन्वेषणाचा अहवाल मागितला !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिर दान चोरीच्या प्रकरणाची नोंद घेत केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाकडून अन्वेषणाचा अहवाल मागवला आहे. यासमवेतच घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जुलै या दिवशी होणार आहे.

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला मिळालेल्या देणग्या आणि अर्पणाच्या व्यवस्थापनात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या जनहित याचिकांच्या समुहावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने वरील निर्देश दिले.