जैश-ए-मंहमद आणि लष्कर-ए-तोयबा यांसाठी काम करत असल्याचा आरोप !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून चालू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कठुआमधून हाजी लतीफ नावाच्या आतंकवाद्याला अटक केली आहे. हाजी लतीफ हा गेल्या २० वर्षांपासून जैश-ए-मंहमद (महंमद यांची सेना) आणि लष्कर-ए-तोयबा (सदाचरणी लोकांची सेना) या आतंकवादी संघटनांसाठी काम करत असल्याचा आरोप आहे.
🚨 Terror Plot Foiled Ahead of Amarnath Yatra!
A terrorist linked to Jaish-e-Mohammed and Lashkar-e-Taiba has been arrested in Jammu & Kashmir ahead of the Amarnath Yatra. He is accused of helping over 12 Pakistani terrorists infiltrate into India.
This arrest once again… pic.twitter.com/sQBvr6pZyr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 1, 2026
१. त्याने अनुमाने १२ हून अधिक पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यास साहाय्य केले होते.
२. तो पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आय.एस्.आय.’च्या (‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’च्या, म्हणजे आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेच्या) अधिकार्यांशीही थेट जोडलेला होता. तो भारतात घुसलेल्या आतंकवाद्यांना लपण्यासाठी ठिकाणे आणि वाहने पुरवायचा. अटकेनंतर सुरक्षायंत्रणा त्याची कसून चौकशी करत आहेत.
३. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची यात्रा सुरक्षित व्हावी, यासाठी ठिकठिकाणी ‘मॉक ड्रिल’ (आतंकवादी घटनेचा सामना करण्यासाठीचा पूर्व सराव) केले जात आहेत.
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड