दुसर्या महायुद्धापासून जागतिक अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व राहिले आहे. केवळ सत्तापालट आणि लष्करी विस्तार अमेरिकेसाठी पुरेसा नव्हता. इराणमधील तेलाचे राजकारण, चीनच्या विस्ताराला रोखण्यासाठी गट, अमेरिकेचे हस्तक्षेप, अमेरिकेची आर्थिक धोरणे आणि सामंजस्य करार करून तो मोडणारी अमेरिका’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ५)
या लेखाचा भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1060496.html

१. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारतावर आयात शुल्क लावणे
अमेरिकेची भारतविरोधी मानसिकता सध्या भारतावर सातत्याने आयात शुल्कच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून उघडपणे लक्षात येत आहे. भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करतो म्हणून भारतातून आयात होणार्या वस्तूंवर ५० टक्के शुल्क लावणे, तो नंतर विरोधामुळे रहित करणे, पुन्हा शुल्क वाढवणे आणि आता तर १०० टक्के शुल्क लावण्याचा प्रस्ताव सिद्ध करणे. केवळ रशियाकडून तेल खरेदी करतो; म्हणून भारतविरोधी भूमिका अमेरिका घेते, असे नाही. या पूर्वीपासूनच अमेरिका भारतला पाण्यात पहातो.
२. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांमध्ये जगाची विभागणी अन् भारताची अलिप्तता

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यापूर्वी दुसरे महायुद्धही संपले होते; मात्र याच काळात जागतिक पातळीवरही एक विभागणी किंवा गटबाजी चालू झाली होती. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांनी जगातील इतर देशांना आपल्या गटात ओढण्यासाठी एक अघोषित शीतयुद्ध छेडले होते. भारताने कोणत्याही बाजूला जाण्यास नकार दिला आणि एक ‘अलिप्ततावादी चळवळ’ म्हणजेच ‘नॉन-अलाईंड मुव्हमेंट (नॅम)’ चालू केली. या चळवळीमुळे सोव्हिएत युनियनला जितकी नाही; तितकी अमेरिकेला मिरची मात्र चांगलीच झोंबली; कारण या ‘नॅम’ गटामध्ये जगातील जवळपास १२१ देश सामील झाले होते. अमेरिका त्या काळातील अव्वल महासत्ता असल्याने त्यांना भारताची ही चाल खटकली आणि त्यांनी भारताला अपकीर्त करण्याच्या योजना आखण्यास प्रारंभ केला.
३. चीनच्या पंतप्रधानांना ठार करण्यासाठी विमानाचा अपघात घडवून आणणे आणि भारतावर आळ घेणे
१० एप्रिल १९५५ च्या रात्री मुंबईहून एअर इंडियाच्या ‘फ्लाईट ३००’ विमानाने इंडोनेशियासाठी उड्डाण केले; पण हे विमान स्वत:च्या नियोजित ठिकाणी पोचण्यापूर्वीच विमानाच्या उजव्या पंख्यात एक बाँबस्फोट झाला. स्फोटामुळे विमान जळून खाक झाले आणि थेट खाली पॅसिफिक महासागरात बुडाले. या अपघातात १६ लोकांचा मृत्यू झाला. आता या स्फोटाची बातमी रातोरात संपूर्ण जागतिक माध्यमांमध्ये प्रसारित होते. या अपघाताच्या अवघ्या काही घंटे आधी या विमानातून चीनचे पंतप्रधान चाऊ एनलाय प्रवास करणार होते; परंतु अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा बेत रहित झाला आणि म्हणूनच ते वाचले. या बातमीमुळे जगभरात अशी चर्चा चालू होते की, चीनविरुद्ध ‘छद्म युद्ध’ (प्रॉक्सी वॉर) छेडण्यासाठी हा भारताचाच एखादा कट असणार. या अपघातापेक्षा स्वत:वरील खोटा आळ पुसण्यासाठी भारताला अधिक परिश्रम घ्यावे लागणार होते. त्यामुळे भारत सरकारने त्वरित ‘आयबी’च्या (भारताची गुप्तहेर संघटनेच्या) एका तरुण अधिकार्याला या मोहिमेवर तैनात केले आणि त्यानंतर या अन्वेषणानंतर आपल्याला हे समजले की, या संपूर्ण अपघाताच्या कटाच्या मागे ‘सीआयए’चा (अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा) हात होता. नंतर चिनी पंतप्रधानांच्या ‘एजन्सी’नेही हेच सांगितले की, ‘सीआयएने’च त्यांच्या देशातील विरोधी पक्ष ‘के.एम्.टी.’सह हा कट आखला होता.
पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि अणूशास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या निर्घृण हत्या

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि अणूशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा ही भारताला लाभलेली २ उत्तुंग व्यक्तीमत्त्वे होती. एकामध्ये देश सर्वसंपन्न आणि बलशाली बनवायची दृष्टी, तर दुसर्याने भारत अणूशक्तीसंपन्न करायचे लक्ष्य ठेवले होते. होमी भाभा यांनी विधानही केले होते की, भारत वर्ष १९६६ पर्यंत अणूशक्ती संपन्न देश बनेल. जे तंत्रज्ञान त्या काळात केवळ चारच देशांकडे होते आणि म्हणूनच ‘सीआयए’ला हे कोणत्याही परिस्थितीत घडू द्यायचे नव्हते. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाच्या अवघ्या एका वर्षानंतर वर्ष १९६६ मध्ये ‘सीआयए’ने होमी भाभा यांची हत्या केली, त्याचप्रमाणे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ताश्कंद येथे हत्या झाली. ‘सीआयए’च्या एका ‘स्टेशन चीफ’ने स्वतः एका मुलाखतीत हे मान्य केले की, शास्त्रीजी आणि होमी जहांगीर भाभा यांना त्यांनीच मारले होते. (सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला असलेले अमेरिकी पत्रकार आणि लेखक ग्रॅगरी डग्लस यांनी असा दावा केला होता की, त्यांनी ‘सीआयए’चे माजी अधिकारी रॉबर्ट क्राऊली यांच्याशी संवाद साधला होता. या संवादात क्राऊली यांनी मान्य केले होते की, भारताचा अणू कार्यक्रम रोखण्यासाठी ‘सीआयए’ने डॉ. होमी भाभा यांच्या विमानाचा स्फोट घडवून आणला आणि लालबहादूर शास्त्री यांनाही विष देऊन मारले. या दाव्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असले, तरी सध्या हा दावा काही लेखकांकडून मान्य केला जातो.)
– श्री. यज्ञेश सावंत
४. भारताला शह देण्यासाठी पाकिस्तानला भरभरून साहाय्य
‘सीआयए’च्या वरील कटावर पाणी फेरले गेले होते. भारत आणि चीन यांचे संबंध १९६० च्या दशकात काही अंशी चांगले होते. भारताने सैन्य कारवाई करून गोव्यातून पोर्तुगिजांची राजवट उलथवून गोवा कह्यात घेतला. तेव्हा चीनने राजनैतिक पाठिंबा दिला, त्या बदल्यात चीनने तिबेट पादाक्रांत केल्यावर भारताने त्याला काही विरोध केला नाही. यामुळे हे संबंध तोडले तरी पाहिजेत किंवा अशा एका देशावर नियंत्रण ठेवायचे की, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून दक्षिण आशियात अस्तित्व निर्माण करायचे होते. तो देश पाकिस्तानच्या स्वरूपात ‘सीआयए’ला सापडला. पाकिस्तानवर त्यांनी सट्टा लावला आणि त्यांना त्वरित भरभरून आर्थिक अन् लष्करी साहाय्य देणे चालू केले. अशा परिस्थितीत साहजिकच भारताला नाईलाजाने शक्तीचे संतुलन राखण्यासाठी सोव्हिएत युनियनकडे झुकावे लागले. सोव्हिएत युनियनने भारतात मोठे धरण प्रकल्प, विद्यापिठे आणि रुग्णालये इत्यादी उभारण्यात मोठे साहाय्य केले होते.
५. केरळमधील साम्यवादी सरकार उलथवण्यात अमेरिकेचा हात
वर्ष १९५७ मध्ये जगातील पहिले लोकशाही मार्गाने निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार भारतातील केरळमध्ये स्थापन झाले. कम्युनिस्ट विचारसरणीला भारतियांनी मतदान करून ते सरकार निवडून आल्याने केरळ हेच अमेरिकेचे पहिले लक्ष्य बनले. अमेरिकेने त्वरित ‘सीआयए’ला केरळचे सीपीआय सरकार सत्तेवरून पाडण्याची मोहीम सोपवली. अवघ्या २ वर्षांत केरळमध्ये एवढी आंदोलने चालू झाली की, भारत सरकारला स्वतः केरळचे सीपीआय सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. हे सरकार उलथवण्यात ‘सीआयए’चा कट होता, हे पुष्कळ नंतर समजले. ‘सीआयए’ने स्थानिक लोकांपासून आणि भाषांपासून ते केरळच्या कमकुवतपणापर्यंत इतकी तपशीलवार माहिती मिळवली होती की,
त्यांना तेथील सरकार पाडण्यासाठी केवळ वर्ष लागले. तिथे जी आंदोलने होत होती, ती सर्व पैसे देऊन घडवून आणलेली होती, अशीही माहिती आहे.
६. ‘रॉ’ची निर्मिती, ‘रॉ’ अन् ‘सीआयए’ यांच्यात अघोषित युद्ध
भारताच्या भूमीवर पाय रोवून ‘सीआयए’ भारतात अनेक कारवाया करत होती आणि भारताच्या गुप्तहेर संघटनेला त्याची कल्पनाही आली नाही. त्यामुळे ‘सीआयए’च्या कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी भारतावर परकीय शक्तींकडून निर्माण होणार्या धोक्यांची आधीच पूर्वकल्पना येऊन ते धोके नष्ट करण्यासाठी एका प्रभावी गुप्तहेर संघटनेची आवश्यकता भासू लागली आणि त्यातूनच जन्म झाला भारताच्या शक्तीशाली गुप्तहेर संघटनेचा ती, म्हणजे ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’, म्हणजेच ‘राॅ’चा ! आर्.एन्. काव हे त्याचे संस्थापक आणि निर्माते होते. अगदी २५० अधिकार्यांसह निर्माण केलेल्या भारताच्या या गुप्तहेर संघटनेने भविष्यातील ‘सीआयए’चे अनेक कट उधळवून तर लावलेच; त्याखेरीज भारताच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदानही दिले.
(क्रमशः)
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (२१.७.२०२६)
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
पाप-पुण्य
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
शरिराचा वरचा किंवा खालचा भाग येथे आलेली सूज न्यून करण्यासाठी करावयाचा सर्वसाधारण व्यायाम आणि त्याचा योग्य क्रम !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !