‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या मूर्ती खरेदी न करण्याचे आवाहन

नवी देहली – येणार्या गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी नैसर्गिक चिकणमाती किंवा मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात जनतेला केले. ‘गणेशोत्सव अजून काही महिने दूर असला, तरी मूर्ती बनवण्याचे काम आधीच चालू झाले आहे’, असेही त्यांनी नमूद केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाच्या मूर्ती बनविणारे आणि त्या खरेदी करणारे यांना माझे विशेष आवाहन…#MannKiBaat pic.twitter.com/WNEQe7ptoF
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2026
पंतप्रधान मोदी म्हणाले,
‘‘मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, तुमच्या घरात, संकुल किंवा परिसर येथे बसवली जाणारी गणपति बाप्पाची मूर्ती आपल्याच देशातील मातीपासून बनवलेली असावी आणि ती आपल्याच देशातील कुंभार आणि स्थानिक कारागीर यांच्या हाताने साकारलेली असावी.’’
Say NO to PoP, YES to Clay! 🌱
PM Modi appeals to devotees to install eco-friendly clay Sri Ganesh murthy this Ganeshotsav.
Clay murthy dissolve naturally, keeping our sacred water bodies and ecosystems safe from pollution.#MannKiBaat pic.twitter.com/mLkIVfbDpE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 29, 2026
मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती बनवण्याला प्राधान्य द्यावे !
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘‘मी श्रीगणेशमूर्ती बनवणार्यांना मातीच्या मूर्ती बनवण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. तसेच खरेदीदारांनाही विनंती करतो की, त्यांनी मूर्ती कशापासून बनवली आहे ? आणि ती कोणत्या देशात बनवली गेली आहे ?, याची निश्चित पडताळणी करावी. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मला निश्चिती आहे की, या गणेशोत्सवात आणि त्यानंतरच्या प्रत्येक सणात आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार कराल आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने पावले उचलाल.’’
मातीच्या मूर्ती पाण्यात नैसर्गिकरित्या विरघळून जलस्रोतांचे रक्षण होते !
पंतप्रधान पुढे म्हणाले,
‘‘श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर या मूर्ती पाण्यात नैसर्गिकरित्या विरघळतात. त्यामुळे नद्या, तलाव आणि एकूणच जल परिसंस्थेचे (‘इको सिस्टम’चे) रक्षण होते.’’ |


दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !