१६० हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील रुस्तमपूर भागातील मधुर शहनाई हॉलमध्ये प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशन आयोजन समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या या अधिवेशनात १६० हून अधिक हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर गोहत्या आणि धर्मांतरावर बंदी घालणारे कायदे करण्यासह ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिन्दू संगठनों में समन्वय स्थापित करके उन्हे एकजुट कर हिन्दू ईकोसिस्टम निर्माण करने हेतु #गोरखपुर में हिन्दू राष्ट्र अधिवेशन संपन्न !
राष्ट्रीय स्तर पर लव जिहाद एवं कॉर्पोरेट जिहाद विरोधी कानून पारित करने की हुई मांग !@HinduJagrutiOrg @Ramesh_hjs pic.twitter.com/oUmmSuulXx
— Vishwanath Kulkarni (@vishwanathkul) June 15, 2026
या वेळी गोरखपूर येथे अधिवक्त्यांची परिषद आणि चर्चासत्रे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवक्ता शेष नारायण पांडे, अधिवक्त्या लक्ष्मी शंकर शुक्ला, अधिवक्ता शैलेंद्र बहादूर सिंग, अधिवक्ता आशुतोष पांडे आणि इतर अनेक हिंदुत्वनिष्ठ यांनी अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक
पत्नीला गोमांस खाण्यास भाग पाडणार्या धर्मांध पतीविरुद्ध गुन्हा नोंद !