मुंबईत १७ मे या दिवशी होणार श्री राजमातंगी महायज्ञ !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री भवानीदेवीचे घेतले भावपूर्ण दर्शन आणि देवीला केला अभिषेक !

तुळजापूर – ‘सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी’, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने १७ मे २०२६ या दिवशी मुंबईच्या प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक पटांगणात ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी १२ मे या दिवशी तुळजापूर येथील श्री भवानी मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांनी येथील श्री भवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि देवीला अभिषेक करून तिची ओटी भरली. यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी देवीच्या चरणांशी यज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली. याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.

तुळजापूर येथील श्री भवानी शंकर मंदिरातील पुजार्यांना झालेला देवीचा स्वप्नदृष्टांत

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री भवानीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरासमोरच असलेल्या श्री भवानी शंकर मंदिराचे दर्शन घेतले. त्यांना पहाताच भवानी शंकर मंदिरात पौरोहित्य करणारे पुजारी श्री. उमेश इनामदार यांनी त्यांना १२ मे या दिवशी पहाटे देवीकडून झालेला स्वप्नदृष्टांत सांगितला. श्री. उमेश इनामदार म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही येणार, हे आम्हाला ठाऊक नव्हते; पण आज पहाटे ३ वाजता साक्षात् देवी माझ्या स्वप्नात आली. देवीने डोळे उघडले आणि तिच्या शेजारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या आज नेसलेल्या साडीमध्ये (पिस्ता रंगाची काठापदराची साडी) दिसल्या. त्यांच्या हातातून देवीच्या चरणांवर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडत होता. ती स्त्री कोण होती ?, हे मला तेव्हा कळले नाही; पण जेव्हा तुम्ही (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) मंदिरात दर्शनासाठी आलात, तेव्हा पहाटेच्या स्वप्नदृष्टांताचा उलगडा झाला, त्या याच होत्या, याचा उलगडा झाला.’’
हे ही वाचा → ॥ श्री राजमातंगी महायज्ञ ॥ |
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !