काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील खोस्त, कुनार आणि पक्तिका या ३ प्रांतांवर पाकिस्तानने केलेल्या हवाई आक्रमणात १३ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी दिली. मृतांमध्ये ११ मुलांचा समावेश असून उर्वरित दोघांमध्ये एका वृद्ध पुरुष आणि एक महिला यांचा समावेश असल्याचेही तालिबानने सांगितले. याविषयी पाकिस्तानने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमेत आक्रमण केल्याचे सांगितले जात आहे.
🚨 TENSIONS ESCALATE
Pakistan has reportedly carried out airstrikes in Afghanistan's Khost, Kunar and Paktika provinces.
The Taliban claims 13 civilians, including 11 children, were killed and several women and children injured.
Pakistan, however, says 26 militants were… pic.twitter.com/ajulOVpLDo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
पाकिस्तानने वारंवार असा आरोप केला आहे की, पाकिस्तानमधील आतंकवादी आक्रमणांसाठी उत्तरदायी असलेल्या संघटनांना, विशेषतः ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या संघटनेला अफगाणिस्तानातील तालिबान सरकार आश्रय देत आहे. दुसरीकडे तालिबानने मात्र पाकचा हा आरोप सातत्याने फेटाळला आहे. हेच सूत्र दोन्ही देशांतील संघर्षाचे प्रमुख कारण आहे. या संघर्षात आतापर्यंत दोन्ही देशांतील शेकडो नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan