भारत आणि पाकिस्तान यांच्यासमवेतचे वाद संवादातून सोडवण्याचे आवाहन

बीजिंग (चीन) – भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक सुरक्षा आणि स्थैर्य यांसाठी महत्त्वाचे असून तिन्ही देश यासाठी सहमत आहेत, अशी भूमिका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी नियमित पत्रकार परिषदेत मांडली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच भारत, रशिया आणि चीन यांच्यातील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या पार्श्वभूमीवर चीनने त्याची भूमिका स्पष्ट केली.
लिन जियान पुढे म्हणाले की, भारत, रशिया आणि चीन या तीनही उदयोन्मुख अर्थव्यवस्था असून त्यांच्यातील चांगले संबंध केवळ संबंधित देशांच्याच नव्हे, तर प्रादेशिक आणि जागतिक हितासाठीही आवश्यक आहेत. त्रिपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चीन भारत आणि रशिया यांच्याशी संवाद कायम ठेवण्यास चीन सिद्ध आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरवरील परिस्थिती सर्वसाधारणपणे स्थिर आहे. दोन्ही देशांमधील संवादयंत्रणा कार्यरत असून मतभेद संवादाद्वारे सोडवले जावेत. भारत आणि चीन यांनी एकमेकांकडे स्पर्धक म्हणून नव्हे, तर सहकार्य भागीदार म्हणून पहावे. भारत-पाकिस्तानमधील मतभेदही संवाद आणि चर्चेद्वारे सोडवावेत.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले