
सोलापूर – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून होणारी वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र सेना, मानद पशूकल्याण अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर्.टी.ओ.) सोलापूर यांना निवेदन दिले.
यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आदेश, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदे, महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाच्या २१ मे २०२६ च्या परिपत्रकानुसार अवैध गोतस्करी रोखण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्र शासन नियुक्त मानद पशूकल्याण अधिकारी केतनभाई शहा यांनी गोवंश संरक्षण हा सार्वजनिक सुव्यवस्था आणि समाजहिताशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सांगितले. हिंदु राष्ट्र सेना जिल्हाप्रमुख श्री. रवि अण्णा गोणे यांनी अवैध गोतस्करी करणार्यांवर कठोर गुन्हे नोंद करून संबंधित वाहनांचे परवाने रहित करण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे नगरसेवक सतीश अण्णा सिरसिल्ला, भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विजय महिंद्रकर, ‘जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थे’चे अध्यक्ष विजय यादव आदी उपस्थित होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !