
कोल्हापूर, १८ मे (वार्ता.) – हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा रहित करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले. या प्रसंगी चंदगड येथील भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते. मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

कोल्हापूर येथे निवेदन देतांना मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अशोक गुरव, ‘जोतिबा देवस्थाना’चे पुजारी श्री. रणजित चौगुले आणि श्री. ओंकार बनकर, माणगाव येथील मारुति मंदिराचे पुजारी श्री. कृष्णात गुरव, श्री. हरि पुजारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रमसिंह जरग, सर्वश्री शशी बीडकर, तानाजी आंग्रे, भीमराव पाटील, दत्तात्रय गावडे, हिंदु महासभेचे श्री. प्रशांत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

१. शाहूवाडीचे नायब तहसीलदार श्री. प्रदीप जाधव यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, नगरसेवक श्री. महेश कोठावळे, माजी नगरसेवक श्री. उदयसिंह कोकरे-देसाई, सर्वश्री दिलीप गुरव, विजय गुरव, प्रशांत निळकंठ, रमेश पडवळ, जितेंद्र पंडित, अनंत डोणे, विजय मोरबाळे आदी उपस्थित होते.

२. हातकणंगले येथे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पुजारी सर्वश्री प्रशांत खोत, रामचंद्र जाधव, अजित कोळी, राहुल कारंडे, भाजपचे श्री. अभिजित अरवाडे, श्री. रावसाहेब चौगुले, श्री. पंकज बुढ्ढे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. दीपक कोळी, सर्वश्री सचिन डोंगरे, नितीन शिंगे, ऋषिकेश बनकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.
सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

सांगली – येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीनराजे शिंदे, मिरज शहराध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, जिल्हाउपाध्यक्ष श्री. राजू जाधव, सर्वश्री दत्तात्रय भोकरे, अवधूत जाधव, सचिन भोसले, विजयसिंह राजपूत, ‘श्री ज्ञानगिरी मठा’चे श्री. शिवप्रसाद सातपुते, श्री वीरभद्र मंदिराचे विश्वस्त श्री. अशोक कबाडे, ‘गोकुळनंदन गोशाळे’चे श्री. नितेश जाधव, ‘गवळी समाज श्रीकृष्ण मंदिरा’चे श्री. मनोज गवळी, श्री. राजू गवळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, मंदिर महासंघाचे श्री. संजय घाटगे, गोंधळी समाजाचे श्री. नितीन बोरावत, अधिवक्ता सुमेध ठाणेदार हे उपस्थित होते.



याच मागणीचे निवेदन ईश्वरपूर आणि तासगाव येथेही देण्यात आले.
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री