Congress Party Of Muslims : काँग्रेस हा मुसलमानांचाच पक्ष असल्याचे सिद्ध – आसाममध्ये १९ पैकी १८, तर बंगालमध्ये दोन्ही आमदार मुसलमान !

गौहत्ती (आसाम) – वर्ष २०१८ मध्ये ‘इन्कलाब’ या उर्दू वृत्तपत्राने दावा केला होता की, राहुल गांधी यांनी ‘काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यात तथ्य आहे कि नाही ?, हे स्पष्ट नाही, तरी सध्या आसाममध्ये निवडून आलेल्या १९ आमदारांपैकी १८ आमदार मुसलमान आहेत, तर उर्वरित एकजण हिंदु आहे. बंगालमधील काँग्रेसच्या नवनिर्वाचित दोन्ही आमदारांची मोताब शेख (फरक्का मतदारसंघ) आणि झुल्फिकार अली (राणीनगर मतदारसंघ) अशी नावे आहेत.

केरळमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित १३ टक्के आमदार मुसलमान !

केरळमध्ये काँग्रेसच्या निवडून आलेल्या ६३ आमदारांपैकी किमान ८ आमदार मुसलमान आहेत. याचा अर्थ साधारण १३ टक्के आमदार मुसलमान आहेत. यासमवेतच केरळच्या ‘संयुक्त लोकशाही आघाडी’मध्ये काँग्रेसनंतरचा सर्वांत मोठा घटक पक्ष हा ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ आहे.या पक्षाची स्थापना पाकिस्तानचे संस्थापक महंद अली जिन्ना यांनी केली होती. देशाच्या फाळणीनंतर ‘ऑल इंडिया मुस्लिम लीग’ची जागा पाकमध्ये ‘मुस्लिम लीग’ने, तर भारतात ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ने घेतली. यातून हिंदु सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या वातावरणातही काँग्रेसचे मुसलमानप्रेम लपून राहिलेले नाही.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या लांगूलचालनामुळेच हिंदूंनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. तरीही काँग्रेस काही शहाणी होत नाही. संकटकाळी मती भ्रष्ट होणे, असे जे म्हणतात, त्याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस ! आता जागृत झालेला हिंदु समाज काँग्रेसचा देशभरातून राजकीय अंत केल्याखेरीज शांत बसणार नाही, हे तिने लक्षात ठेवावे !