Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !

रोम (इटली) –  येथील एका उपाहारगृहामध्ये हुसेन नावाच्या बांगलादेशी मुसलमान वेटरने काही भारतीय महिलांशी अत्यंत उद्धटपणे आणि असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने भारताविषयीही अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषेचा वापर केला आहे. याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवणार्‍या खुशी दुबे यांनी प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये खुशी दुबे आणि त्यांच्या काही मैत्रिणी उपाहारगृहामध्ये असतांना हुसेन नावाचा वेटर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्यांच्याशी वागत असल्याचे दिसत आहे. (इटली पोलिसांनी देशाची प्रतिमा मलिन करणार्‍या धर्मांध कर्मचार्‍याच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

१. व्हिडिओमध्ये तो वेटर म्हणतो, ‘तुम्ही मूर्दाड भारतामधून आहात’ आणि उलट महिलांनाच पोलीस बोलावण्याची धमकी देतो.

२. काही वेळातच घटनास्थळी स्थानिक पोलीस पोचतात. ते खुशी दुबे आणि त्यांच्या मैत्रिणी यांना साहाय्य करतात.

३. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर भारतीय महिला त्या वेटरला क्षमा मागण्यास सांगतात; परंतु तो क्षमा मागतांना आढेवेढे घेतांना दिसतो.

४. व्हिडिओमध्ये खुशी दुबे त्याला ठणकावून सांगते, ‘नीट क्षमा माग, मी भारताला शिवी दिल्याविषयी क्षमा मागतो, असे बोल.’

५. सामाजिक माध्यमांवर खुशी दुबे आणि त्यांच्या मैत्रिणी यांच्या धारिष्ट्याचे कौतुक केले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशींमध्ये भारताविषयी किती द्वेष आहे, हे अशा उदाहरणांवरून लक्षात येते !