हिंदूबहुल भारतात ‘हिंदु’ म्हणून झालेले आघात !
नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना, तर २ राज्यांत धर्मांतराच्या २ घटना उघड झाल्या आहेत.
लव्ह जिहादच्या घटना
उत्तरप्रदेश
१. अमरोहा – जिल्ह्यातील बछरायूं येथील राशिद कुरेशी याने एका घटस्फोटित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिला दोनदा गर्भपात करण्यास बाध्य केले, तसेच तिच्याकडून १ लाख रुपयेही उकळले. याविषयी जाब विचारला असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांत राशिद याच्यासह खालिद, साजिद, लड्डू आणि आसिम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२. बिजनौर – येथील एका घटस्फोटित हिंदु महिलेने अकबराबादमधील नागिना भागातील एका व्यक्तीवर (बहुधा मुसलमान) आरोप केले की, विवाहाचे आमीष दाखवून व्यक्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर विवाह करण्यास नकार दिला. या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण केले जात आहे.
🚨 𝟲 𝗔𝗹𝗮𝗿𝗺𝗶𝗻𝗴 𝗜𝗻𝗰𝗶𝗱𝗲𝗻𝘁𝘀 𝗶𝗻 𝗝𝘂𝘀𝘁 𝟮𝟰 𝗛𝗼𝘂𝗿𝘀!
4 Incidents of Love Jihad – 2 Cases of Forced Conversion
▪️Amroha (UP): Rashid Qureshi exploited a Hindu woman on the false promise of marriage, forced 2 abortions, extorted ₹1 lakh, and threatened her.… https://t.co/AHSlAGvdv2 pic.twitter.com/hfczftPmeJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2026
राजस्थान
उदयपूर – एका हिंदु मुलीशी इन्स्टाग्रामवरून ओळख करून एका मुसलमानाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिची काही चुकीची छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल केले आणि १० ते १५ लाख रुपये उकळले. तिचा एका हिंदु युवकाशी विवाह करण्यात आल्यावरून मुसलमानाने ‘तुझ्या वडिलांचा कन्हैयालालसारखा शिरच्छेद करीन’, असे धमकावले. जानेवारी २०२६ मध्ये पोलिसांत तक्रार केल्यानंतरही काही कारवाई न झाल्याने पीडिता आणि तिचा पती यांनी विषप्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर असून आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुजरात
राजकोट : आम आदमी पक्षाची कार्यकर्ती २३ वर्षीय नंदिनी बोस्मिया हिने आत्महत्या केली आहे. तिला लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवण्यात आले होते. कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता तिने अस्लम अमानुष याच्याशी विवाह केला. पुढे सासरची मंडळी तिला त्रास देऊ लागली. पीडितेच्या वडिलांनी आरोप केला की, अस्लमने त्यांच्या मुलीची हत्या केली असून ते हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगत आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अन्वेषण चालू आहे.
हिंदूंच्या धर्मांतराच्या घटना !
१. पीलीभीत (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील रामनगर भागातील हजारा क्षेत्रात राजीव कुमार यांनी रामा राजभर या ख्रिस्त्याच्या विरोधात धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी तक्रार केली. कुमार यांनी आरोप केला की, राजभर याने मला बायबल देत मी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मला पैसे आणि नोकरी मिळेल. पोलिसांनी या प्रकरणी राजभरला अटक केली असून त्याच्याकडून धर्मांतराच्या वस्तू आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे.
२. बिकानेर (राजस्थान) – येथील एका ३२ वर्षीय विवाहित हिंदु महिलेने तिच्या ५ वर्षीय मुलीसह उत्तरप्रदेशातील गाझियाबाद शहर गाठले. गुलबहार उपाख्य मायरा खान नावाच्या महिलेने सामाजिक माध्यमाद्वारे तिच्याशी मैत्री केली. हिंदु महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला की, तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न असू शकतो. पोलिसांना पीडिता लक्ष्मणपुरीत सापडली; परंतु ती आता परतायला सिद्ध नाही. पोलीस या प्रकरणात योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !