Corporate Jihad – What’s the Truth ? : जिहाद्यांची मानसिकता मोडून काढण्याचा उपस्थितांचा निर्धार !

‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानाचा लोगो हातात धरून अभियानाचा प्रारंभ करतांना डावीकडून खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, लेखिका सौ. शेफाली वैद्य व समितीचे श्री. रमेश शिंदे !

पुणे, ४ मे (वार्ता.) – केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या ‘राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागा’च्या (एन्.सी.आर्.बी. अर्थात् ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या) अहवालानुसार देशभरात वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधीत ४ लाख ६५ सहस्रांहून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रातून बेपत्ता होणार्‍या मुलींचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत असल्याचेच अहवालावरून दिसून येत आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणार्‍या मुलींच्या सुरक्षेसाठी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ पुण्यात करण्यात आला. ‘कॉर्पोरेट जिहाद – नक्की सत्य काय ?’ या विशेष संवादात मान्यवर वक्त्यांनी अभियानाची सखोल माहिती दिली.

शिवाजीनगर येथील ‘मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम’मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांसह ५५० हून अधिक पुणेकर नागरिकांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांपैकी बर्‍याच धर्मप्रेमींनी शंकांचे निरसन करवून घेतले आणि प्रश्नोत्तरांच्या सत्रात सहभाग नोंदवला.

कॉर्पोरेट जिहादचे सूत्र संसदेत मांडून आस्थापनांसाठी नियम-अटी करणार ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

आता ‘करा किंवा मरा’ अशी वेळ आली असून हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. आज आपल्यासमोर उभे असलेले संकट केवळ ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रापुरते मर्यादित नाही. जिथे संधी मिळेल, तिथे भारताचे अस्तित्व पोखरण्याचे आणि देशाचे लचके तोडण्याचे कारस्थान पद्धतशीर चालू आहे. सर्व धर्मामध्ये हिंदु धर्म वेगळा आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला आपला धर्म, संस्कृती आणि अस्तित्व टिकवायचे असेल, तर केवळ विचार करून चालणार नाही, तर कृती करण्याची वेळ आली आहे. ‘कॉर्पोरेट जिहाद’चे सूत्र मी आगामी काळात संसदेत मांडणार आहे.

आपल्याला आपला धर्म टिकवायचा असेल, तर प्रतिदिन मंदिरात जावे लागेल. आपल्या प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे. त्यामुळे हिंदूंनीही आता बुद्धीचे शस्त्र वापरायला हवे. ‘करा नाहीतर मरा’ अशी वेळ सर्वांवर आली आहे. आपण कणखर आणि संघटित बनूया, मिळमणीत धोरण टाकून देऊयात. ‘कोणतीही खरेदी हिंदूंकडूनच करणार’, असा सर्वांनी निश्चय करूया.

कार्पोरेट आस्थापनांमधील वाढता जिहाद रोखण्यासाठी ही आस्थापने भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर काही बंधने, अटी लागू करू शकतो का यादृष्टीने विचार चालू आहे. जिहादच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सक्रीय होण्याची आवश्यकता आहे. – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

#LIVE | Corporate Jihad: What’s the Truth? | Special Panel Discussion

‘ऑपरेशन दुर्गा’ ही हरियाणा सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि छेडछाड रोखण्यासाठी चालू केलेली एक विशेष पोलीस मोहीम आहे. त्याप्रमाणेच ‘हिंदु जनजागृती समिती’च्या साहाय्याने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘ऑपरेशन दुर्गा’ राबवूया, असा विचार त्यांनी मांडला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने एक आशेचा किरण जागृत झाला आहे. – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

जो धर्माचे कार्य करील, धर्म त्याचेच रक्षण करील ! – सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिका

सौ. शेफाली वैद्य

हिंदूबहुल भागात आपल्याला ‘कॉर्पोरेट जिहाद’ विषयी बोलावे लागत आहे, हीच लज्जास्पद गोष्ट आहे. कॉर्पोरेट जिहाद म्हणजे अन्य धर्मियांना सूट आणि हिंदु धर्मियांना नियमांच्या नावाखाली बंधने घालणे ! हिंदू आज प्रतिकार करत नाहीत, केवळ सहन करत रहातात, म्हणूनच अपराधांची ही मालिका वाढत चालली आहे. अशाच पद्धतीने ‘ब्रोकन विंडो थिअरी’ लागू होते. याचा अर्थ गाडीची काच फुटल्यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे संपूर्ण गाडीच लुटली जात आहे. ‘लेन्सकार्ट’सारख्या दुकानांमध्ये जेव्हा असे प्रकार घडतात, तेव्हा त्या विरोधात आवाज उठवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. यावरूनच हिंदूंमध्ये धर्माविषयी अनास्था असल्याचे उघड होते. जोपर्यंत हिंदू ठामपणे प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हे असेच चालू रहाणार आहे. जो धर्माचे कार्य करील, धर्म त्याचेच रक्षण करील, हे लक्षात घ्यावे.

जिहादला कोणतीही सीमा नसल्यामुळे आपल्याला स्वबोध आणि शत्रूबोध असायला हवा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रमेश शिंदे

आज समाजामध्ये घडणार्‍या गंभीर गोष्टी पाहिल्यावर नराधमांना फाशीपेक्षाही गंभीर प्रावधान करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, हे लक्षात येते. ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘थूंक जिहाद’, दंगलीच्या माध्यमातून होणारा जिहाद या सर्व गोष्टी भारतात पुष्कळ काळापासून चालू आहेत. नाशिक येथील धर्मांतराच्या प्रकरणामुळे ‘कॉर्पोरेट जिहाद’ हा नुकताच चालू झाला आहे’, असे सर्वांना वाटत आहे; मात्र ‘गझवा-ए-हिंद’ म्हणजेच संपूर्ण भारताचे इस्लामीकरणाचे मुसलमानांचे स्वप्न आहे. ‘व्हिजन २०४७’चा दस्तऐवज, हे भारताच्या इस्लामीकरणाचे लिखित दस्तऐवज आहे. वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली आणि मुसलमानबहुल राज्ये निर्माण व्हायला लागली, वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाची निर्मिती, वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा नरसंहार आणि वाढलेला आतंकवाद, वर्ष १९९२ मध्ये झालेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’, वर्ष २००६ मध्ये लव्ह जिहादचे उघडकीस आलेले प्रकरण या आणि अशा कित्येक घटनांमधून जिहाद्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. त्यामुळे स्वबोध आणि शत्रुबोध समजून घेणे आवश्यक आहे. हिंदूंनी आपला एकमेकांसमवेत संवाद वाढवूया. प्रत्येक आई-वडिलांनी पाल्यासमवेत बोलण्यासाठी दिवसभरातून १५ मिनिटे वेळ काढणे आवश्यक आहे.

कार्यक्रमला उपस्थित कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणी आणि पुणे येथील नागरिक

प्रतिक्रिया

अधिवक्ता मंगेश मुंजळेकर – लव्ह जिहादच्या संदर्भातील मार्गदर्शन वेगवेगळ्या शहरात, खेड्यापाड्यांत आयोजित करून सर्वत्रच्या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे. बहुसंख्या हिंदूंनी याचा लाभ घ्यावा. लव्ह जिहादच्या विरोधातील कार्यात सर्वांनी सहभाग नोंदवून जनजागृती करावी.

क्षणचित्रे

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ घोषणा देऊन केला. कार्यक्रम संपल्यावर जातांना सर्व धर्मप्रेमींनी जोरदार घोषणा दिल्या