फ्रान्सिस झेविअरवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून ‘गोवा न्यूज हब’वरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी यांचा परखड प्रश्न !
१८ एप्रिल २०२६ या दिवशी वास्को येथे भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअर याच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असून यावरून गोव्यात वाद निर्माण झाला. या विषयावर चर्चा करण्यासाठी ‘गोवा न्यूज हब’ या वृत्तवाहिनीवर ‘हब गजाली’ या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या चर्चासत्रात गोवा प्रदेश युवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अधिवक्ता अर्चित नाईक सहभागी झाले होते. या चर्चासत्रात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना डॉ. मनोज सोलंकी यांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली. यातून प्रशासनाचा आणि काँग्रेस पक्षासारख्या राजकीय पक्षांचा दुटप्पीपणा उघड केला.

१. कुठल्याही धर्मातील संत किंवा धर्मग्रंथ यांवर आक्षेपार्ह बोलण्याच्या विरोधात कायदा व्हायला हवा !
प्रश्न : या घटनेला आयोजक उत्तरदायी आहेत कि प्रशासन ?
डॉ. मनोज सोलंकी : कोणत्याही व्यासपिठावरून अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. कुठलाही धर्म किंवा कुठल्याही धर्मातील संत किंवा धर्मग्रंथ यांवर कुणीही आक्षेपार्ह बोलू नये, यासाठी कायदा व्हावा.
या प्रसंगावरून एवढा वाद का चालू आहे ? हिंदु धर्मियांच्या विरोधात अशी कितीतरी वक्तव्ये केली जात आहेत. या घटनेवरून मोठा गदारोळ माजला आहे; परंतु हिंदू हे कित्येक वर्षे अनुभवत आहेत. आजपर्यंत हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर अनेक जणांनी टीका केली. काँग्रेसचे प्रियांक खर्गे, तसेच तमिळनाडूतील द्रमुक पक्षाचे उदयनिधी स्टॅलीन यांनी तर ‘सनातनचा अंत करा’, अशी वक्तव्ये केली. त्यामुळे कायदा व्हावा, अशी आमची मागणी आहे. आक्षेपार्ह बोलण्याच्या विरोधात कायदा झाला, तर अशी प्रकरणे घडणार नाहीत.
डॉ. मनोज सोलंकी यांनी केलेली काही परखड वक्तव्ये

१. झेविअरविषयी बोलल्यावरून एवढा वाद का चालू आहे ? हिंदु धर्मियांच्या विरोधात अशी कितीतरी वक्तव्ये केली जात आहेत. या घटनेवरून मोठा गदारोळ माजला आहे; परंतु हिंदू असले प्रकार कित्येक वर्षे अनुभवत आहेत.
२. हे प्रकरण एका विशिष्ट धर्माशी निगडित आहे; म्हणून एवढा गदारोळ चालला आहे का ?
३. हिंदु जनजागृती समितीच्या सभा होतात; पण अशा प्रकारची एकही घटना कधी घडली नाही. आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे वागतो.
४. माझ्या धर्मातील देवाखेरीज कोणताच देव श्रेष्ठ नाही. तेव्हा काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव कुठे असतो ? जेव्हा हिंदूंना लक्ष्य केले जाते, तेव्हा काँग्रेसचे लोक गप्प का बसतात ?
२. काँग्रेसवालेच हिंदूंच्या धर्मभावना दुखवतात !
प्रश्न : या घटनेवर तुम्ही तीव्र आक्षेप का घेत नाही ?
डॉ. मनोज सोलंकी : या घटनेच्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांचे अन्वेषण चालू आहे. त्यामुळे आम्ही आणखी काय करायला हवे ? आम्ही गौतम खट्टर यांच्या वक्तव्याचे खंडण करतो. अशा वक्तव्याचा विरोध करतो; परंतु त्यांनी हे वक्तव्य कोणत्या आधारावर केले आहे, ते पहायला हवे. त्यासंबंधी अन्वेषण चालू आहे. दुसरे म्हणजे म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढली. उदयनिधी स्टॅलीन यांनी ‘सनातनचा अंत करा’, असे विधान केले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी कुंभमेळ्याच्या वेळेस जे विधी करतात, त्यांवर टीका केली. हे काँग्रेस या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते हिंदु परंपरांवर टीका करतात. यांच्या विरोधात काँग्रेसने कधी आंदोलन केले आहे का ? उलट अशा काही माणसांना खासदारपद दिले गेले.
३. अशा घटनांना वैध मार्गाने विरोध व्हावा !
प्रश्न : हीच घटना हिंदु धर्माविषयी घडली असती, तर तुम्ही काय करणार होता ?
डॉ. सोलंकी : अशा घटनांच्या संदर्भात वैध मार्गाने विरोध करावा. हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्या, तेव्हा हिंदु जनजागृती समितीने सनदशीर मार्गाने विरोध केला आहे. म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढली, तेव्हा आम्ही सनदशीर मार्गाने विरोध केला. आमच्या हिंदु जनजागृती समितीच्या सभा होतात; पण अशा प्रकारची एकही घटना घडली नाही. आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे वागतो. आपण उदाहरण समोर ठेवले पाहिजे.
काँग्रेसचे अधिवक्ता अर्चित नाईक यांनी केलेली वक्तव्ये आणि त्याचे डॉ. मनोज सोलंकी यांनी केलेले खंडण
१. ‘सनातन’ म्हणजेच हिंदु धर्म !
वक्तव्य : ‘सनातन’ म्हणजे सर्व हिंदु नव्हेत !
खंडण : इथे ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ‘सनातन’ म्हणजे नित्य नूतन. ज्याला प्रारंभ नाही आणि अंत नाही ते ‘सनातन’ ! आम्ही आमच्या हिंदु धर्माला ‘सनातन हिंदु धर्म’ म्हणतो. ‘सनातन’ या शब्दाला पुष्कळ मोठा अर्थ आहे. म्हणून ‘सनातन’ म्हणजेच हिंदु धर्म आहे.
२. कायदा न केल्यास जातीय तणाव होत रहाणार !
वक्तव्य : कोणत्याही धर्माच्या विरोधात कुणीच बोलू नये !
खंडण : आमची तीच मागणी आहे. तुम्ही त्याला पाठिंबा देणार का ? जेव्हा हिंदूंच्या विरोधात अशी काही वक्तव्ये केली जातात, तेव्हा कधी काँग्रेसने आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिलेला पाहिला नाही. उलट श्रीराममंदिराला विरोध केला होता. कोणत्याही व्यासपिठावरून अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, यासाठी कायदा व्हावा, अशी आमची मागणी आहे; कारण अशा परिस्थितीला अधिक प्रमाणात हिंदूंना सामोरे जावे लागते. ही समस्या आम्हाला अनेक वर्षे भेडसावत आहे. हिंदु धर्मातील संत, राष्ट्रपुरुष यांच्यावर टीका होत असते. त्यामुळे कायदा करणे, हाच एकमेव उपाय आहे. नाही तर जातीय तणाव होत राहील. हे प्रकरण एका विशिष्ट धर्माशी निगडित आहे; म्हणून एवढा गदारोळ चालला आहे का ?
३. ‘माझा देवच श्रेष्ठ’, असे काही पंथ म्हणतात, तेव्हा काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव कुठे असतो ?
वक्तव्य : सर्वधर्मसमभाव पाळला पाहिजे. आम्ही सर्वधर्मसमभाव पाळतो.
खंडण : ‘सर्वधर्मसमभाव पाळावा’, अशी वक्तव्ये केली जातात; परंतु इतर धर्मीय सांगतात की, माझ्या धर्मातील देवाखेरीज कोणताच देव श्रेष्ठ नाही. तेव्हा हा सर्वधर्मसमभाव कुठे असतो ? जेव्हा हिंदूंना लक्ष्य केले जाते, तेव्हा काँग्रेसचे लोक गप्प का बसतात ?
४. वक्ता ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे हवीत !
प्रश्न : वक्ता ठरवतांना त्याची पार्श्वभूमी पडताळली पाहिजे का ?
डॉ. सोलंकी : सभेसाठी वक्ता बोलावतांना त्याची पार्श्वभूमी पडताळली पाहिजे. आम्ही जेव्हा आमच्या सभेसाठी बाहेरील वक्ता बोलावतो, तेव्हा आमच्या बाजूने आम्ही तपाससूची सिद्ध करतो. हिंदु धर्माकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि आमचे जे मिशन (चळवळ) आहे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ त्यासाठी जे आवश्यक आहे, असे सांगण्याकरता आमच्या उद्देशाशी जुळणारा वक्ता आम्ही निवडतो. आमची मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यामुळे अशी मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक आहे. त्यांना आम्ही विषय देतो की, त्यांनी कोणत्या विषयावर बोलायचे आहे. काही वेळा असे घडू शकते की, तो वक्ता आयोजकांच्या तत्त्वाशी न जुळणारे वक्तव्य करू शकतो. तेव्हा आम्ही ‘हे वक्तव्य आमच्या तत्त्वाशी जुळणारे नाही’, असे घोषित करतो किंवा आमचा कोणता तरी वक्ता त्वरित येऊन त्याविषयी स्पष्टीकरण देतो. लोकांना समितीचा हेतू ठाऊक असतो; परंतु काही वेळा अशी घटना घडू शकते.’’
|
(सौजन्य : ‘गोवा न्यूज हब’) |
५. भोंदू संत ओळखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण द्यायला हवे !
प्रश्न : पूर्वी संत म्हणजे त्यांचे मठ आणि त्यांचे शिष्य वगैरे होते. सामाजिक माध्यमाच्या युगात पुष्कळ जण स्वतःला संत म्हणवतात, स्वतःची संस्था काढतात, याविषयी तुमचे मत काय?
डॉ. सोलंकी : हा प्रश्न पुष्कळ चांगला आहे. आज हिंदूंना धर्मशिक्षण नाही. खरे संत आणि भोंदू संत कसे ओळखावे याविषयी हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करत आहे. आज समाजात पुष्कळ जण स्वतःला संत म्हणवतात. आज हिंदूंना धर्मशिक्षण नाही. आमचे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, कलियुगात ९९ टक्के संत हे भोंदू असतात. गुरूंच्या शोधात कधी जाऊ नये. कुलदेवतेचा नामजप चालू करा, मग तुमच्या जीवनात गुरु येईल. आमच्या गुरूंनी भोंदू संत कसे ओळखावे ? याविषयी ग्रंथ लिहिला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले, तर असले व्यवहार बंद होतील. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन आम्ही त्यांना खरे संत ओळखायला शिकवतो. आम्ही सर्व लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आमचे धर्मसंत्संग, प्रवचने, बालसंस्कार वर्ग यांतून हा संदेश आम्ही पोचवत आहोत. मुख्य म्हणजे हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव आहे. इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळते. ख्रिस्त्यांना चर्चमधून मिळते, तर मुसलमानांना मदरशांतून मिळते. हिंदूंना मंदिरांतून धर्मशिक्षण कुठे मिळते ? हिंदूंचे धर्मांतर का होते ? तर त्यांना धर्मशिक्षण नाही म्हणून !
६. काँग्रेस आता जागी झाली आहे का ?
प्रश्न : हिंदू इतर धर्मांविषयी अशी वक्तव्ये करून हिंदु धर्माला कलंक लावतात का ?
डॉ. मनोज सोलंकी : अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्याही व्यासपिठावरून करू नये. म्हणून आम्ही यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे कायदा करावा, असे सांगत आहोत; कारण प्रत्येक दिवशी आम्हाला ही समस्या भेडसावते. काँग्रेस आता जागी झाली आहे. हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ पाहिले, तर लक्षात येईल की, हिंदु धर्माविरुद्ध बोलणार्यांच्या विरोधात आम्ही कितीतरी खटले प्रविष्ट केले आहेत. मी स्वतः अमेरिकेतील रॉबिन फॉलेविरुद्ध तक्रार केली होती.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई