मालदीवकडून भारताचा विश्वासघात !

माले (मालदीव) – चीनची तथाकथित ‘संशोधन नौका’, म्हणजेच हेरगिरी करणारी नौका ‘शी यान ६’ मालदीवमध्ये दाखल झाली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात भ्रमंती पूर्ण केल्यानंतर या नौकेने २४ एप्रिल २०२६ या दिवशी मालदीवची राजधानी माले येथील बंदरात नांगर टाकला. भारताच्या आक्षेपानंतरही मालदीव नेहमीच भारतविरोधी कारवायांना आश्रय देत आला आहे. विशेष म्हणजे मालदीवने या चिनी नौकेला अशा वेळी त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिली आहे, जेव्हा भारताने मालदीवला ३ सहस्र कोटी रुपयांचे चलन साहाय्य केले आहे. एप्रिल २०२६ मध्ये भारताने कर्ज फेडण्यास साहाय्य करण्यासाठी ‘करन्सी स्वॅप’ (ठराविक कालावधीसाठी दोन पक्षांनी वेगवेगळ्या चलनांची देवाण-घेवाण करून नंतर ती परत करण्याचा करार) स्वरूपात हे महत्त्वपूर्ण साहाय्य पुरवले आहे.
Aid from India, Port for China? 🚨🇮🇳🇨🇳
After receiving nearly ₹3,000 crore in financial assistance from India, Maldives has now allowed Chinese vessel Shi Yan 6 to dock sparking fresh security concerns in the Indian Ocean. 🌊
When will India’s self-destructive “Gandhigiri”… pic.twitter.com/xSInMWP6mA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2026
मालदीव सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यांचा परकीय चलनसाठा सातत्याने अल्प होत असून ते कर्ज फेडण्याच्या स्थितीत नाहीत. असे असूनही सुंडा सामुद्रधुनीतून हिंदी महासागरात शिरून ‘नाइन्टी ईस्ट रिज’सारख्या संवेदनशील भागात सर्वेक्षण करणार्या चिनी नौकेला मालदीवने अनुमती दिली आहे. हे चीनची तेथील भक्कम पकड दर्शवते. ही भारताच्या सागरी सुरक्षेसाठी मोठी डोकेदुखी आहे.
भारतीय युद्धनौकाही मालदीवमध्ये पोचली !
माले येथील भारतीय दूतावासने माहिती दिली आहे की, भारतीय नौदलाची युद्धनौका ‘आय.एन्.एस्. कल्पेनी’सुद्धा मालदीवमध्ये पोचली असून तिने ‘अड्डू एटोल’ येथे नांगर टाकला आहे. ही भेट आपले घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध आणि बहुआयामी संरक्षण सहकार्य अधोरेखित करते. कदाचित् मालदीव सरकार समतोल राखण्यासाठी असे करत असावे; परंतु हिंदी महासागरात चीनच्या हेरगिरी नौकांचे वारंवार येणे आणि मालदीवने त्यांना थारा देणे, हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी भविष्यात धोका ठरू शकते.
चीनच्या हेरगिरी करणार्या नौकेचे कार्य !
चीन त्याच्या ‘शी यान ६’ या नौकेला वैज्ञानिक संशोधन नौका असल्याचे सांगतो; परंतु प्रत्यक्षात ही चिनी नौदलाची ‘ड्युअल-यूज’ (दुहेरी वापर) नौका आहे. ही नौका हिंदी महासागराची खोली, समुद्राच्या तळाची रचना आणि पाण्याच्या प्रवाहाची माहिती गोळा करते. ही माहिती चीनला त्याची पाणबुडी भारतीय सीमेजवळ गुप्तपणे तैनात करण्यास साहाय्य करते.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !