नाशिक येथील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण

नाशिक – महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात धाडसी आणि गुप्त कारवाई करून षड्यंत्र उघडकीस आणणार्या महिला पोलिसांचा हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना समितीचे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मशिक्षण फलक’ हे ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांना हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने युवती अन् महिला यांच्या रक्षणासाठी राबवत असलेले विनामूल्य शौर्यजागृती स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग, धर्मशिक्षण वर्ग, प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग यांची माहिती देण्यात आली.
#नाशिक '#कॉर्पोरेट_जिहाद' प्रकरण !
महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात धाडसी आणि गुप्त कारवाई करून षडयंत्र उघडकीस आणणाऱ्या महिला पोलिसांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !
नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांचा सत्कार करताना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी
⛳रणरागिणी… pic.twitter.com/zK7uxoFMg3
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 17, 2026
नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभपर्वात समिती आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार प्रशिक्षण अशा प्रकारे समाजसाहाय्याचे कसे उपक्रम राबवू शकते ?, यावर चर्चा केली. या वेळी पोलीस आयुक्तांनी रणरागिणी शाखा आणि समिती यांच्या कार्याचे कौतुक करून ‘आम्ही निश्चितच तुम्हाला पोलीस प्रशासनासमवेत कुंभपर्वाच्या गटात समाविष्ट करून घेऊ’, असे सांगितले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे, श्रीमती वैशाली कातकडे, श्रीमती अनघा पित्रे, सौ. रितुल पाटील, सौ. प्रियांका सूर्यवंशी, सौ. मीनाक्षी कोल्हे, सौ. रंजना अहिरराव, कु. प्रिणल सोनवने, कु. किंजल सोनवने, कु. विशाखा शिंदे, कु. प्रियांका शिंदे, कु. तनिषा बागुल, कु. पूजा चव्हाण, सौ. अर्चना सोनवणे उपस्थित होत्या.
पोलीस आयुक्त मोनिका राऊत आणि त्यांच्या पथकाने केलेली धाडसी कारवाई अभिमानास्पद ! – कु. रागेश्री देशपांडे
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे म्हणाल्या,
‘‘पोलीस आयुक्त मोनिका राऊत आणि त्यांच्या पथकाने नाशिकच्या ‘कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’ प्रकरणात अत्यंत धाडसी आणि गुप्तपणे अन्वेषण करून महिलांवरील अत्याचाराचे हे गंभीर षड्यंत्र उघडकीस आणले. या कारवाईच्या माध्यमातून ‘अन्य ठिकाणी असे अत्याचार निमूटपणे सहन करणार्या महिलांना आपण आता समोर येऊन याविषयी तक्रारी करायला हव्यात, पोलीस दलाचे साहाय्य घ्यायला हवे आणि त्यातून सुटका करून घ्यायला हवी’, हा संदेश गेला असून त्यांना आधार मिळाला आहे.
पोलिसांच्या महिला पथकाने केलेल्या या कारवाईमुळे महिलांमध्ये निश्चितच निर्भयतेचे वातावरण निर्माण होईल. पोलिसांनी अत्यंत अचूक आणि गुप्तपणे हे जे ‘मिशन’ (मोहीम) राबवून या षड्यंत्राचा भांडाफोड केला, याविषयी या सर्व ‘धुरंधर’ महिला पोलिसांचा आम्हा सर्व रणरागिणींना सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी हा सत्कार आम्ही करत आहोत.’’
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !