‘१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव झाला. या लेखात महोत्सवातील पहिल्या आणि दुसर्या दिवशी घडलेल्या विविध घटनांशी संबंधित एकूण सूक्ष्म सूत्रे दिली आहेत.

१. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील प्रमुख घटनांचे आध्यात्मिक विश्लेषण

२. वायुपुत्र हनुमान कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून प्रगट होणे आणि त्याने रज-तमप्रधान लहरींची वावटळ गिळून टाकणे

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १३.१२.२०२५ या दिवशी कार्यक्रम चालू झाल्यावर पृथ्वीच्या वायूमंडलात कार्यरत असणार्या रज-तमप्रधान लहरींची एक वावटळ कार्यक्रमस्थळी आल्यामुळे कार्यक्रमाच्या ध्वनीयंत्रणेत आणि संकेतस्थळावरील थेट प्रक्षेपणात अडथळे निर्माण होऊ लागले. तेव्हा कार्यक्रमस्थळी श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र कार्यरत झाले आणि सुदर्शनचक्रामधून सूक्ष्मातून रामबाण, शिवाच्या धनुष्यातून अमोघ बाण आणि शिवाचे त्रिशूळ अन् श्री दुर्गादेवीची तलवार यांचा वर्षाव झाला. त्यामुळे या वावटळीतील रज-तम कणांचे विघटन झाले. त्यानंतर वायुपुत्र हनुमान कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून प्रगटला आणि त्याने ही वावटळ गिळून टाकली. त्यानंतर पुढील कार्यक्रम स्थुलातून व्यवस्थित चालू झाला.
३. सनातन संस्था-निर्मित श्री गणेशाच्या पांढर्या मूर्तीतून श्री गणेशाचा ‘धूम्रकेतु’ हा अवतार प्रगट होणे आणि त्याने या कार्यक्रमाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करणे
कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी, म्हणजे १४.१२.२०२५ या दिवशी पाताळातील अनिष्ट शक्ती ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या वेळी कार्यक्रमस्थळी सनातन संस्था-निर्मित श्री गणेशाची पांढर्या रंगाची मूर्ती सूक्ष्मातून व्यासपिठावर विराजमान असल्याचे दिसले. या मूर्तीतून श्री गणेशाचा कलियुगातील ‘धूम्रवर्ण’ किंवा ‘धूम्रकेतु’ हा अवतार प्रगट होऊन तो हळूहळू विशालकाय झाला आणि त्याने ब्रह्मांडाला व्यापणारे विराट रूप धारण केले. त्याने त्याच्या सोंडेने वायूचा प्रवाह पृथ्वीच्या वायूमंडलात सोडला. त्यामुळे पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींना काही घंटे दूर पाताळात पळून जावे लागले.
४. धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी अधून मधून शंखनाद करणे आणि राष्ट्रप्रेम अन् धर्मप्रेम जागृत करणार्या घोषणा देणे, यांचे महत्त्व
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सहभागी झालेल्या धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांवर आणि कार्यक्रमाच्या व्यासपिठावर वातावरणातील रज-तमाच्या प्रदूषणामुळे मधेमधे रज-तम लहरींचे त्रासदायक आवरण येत होते. त्यामुळे उपस्थित व्यक्तींना मधेच काहीही सुचत नव्हते. तेव्हा कार्यक्रमस्थळी शंखनाद केला जायचा आणि राष्ट्रप्रेम अन् धर्मप्रेम जागृत करणार्या घोषणा दिल्या जायच्या. त्यामुळे शंखनादातील मारक शक्ती आणि घोषणांमधील क्षात्रतेज यांच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होऊन रज-तम लहरींचे त्रासदायक आवरण नष्ट होत होते अन् पुन्हा उत्साह निर्माण होत होता. यावरून ‘धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मधून मधून शंखनाद करणे आणि राष्ट्रप्रेम अन् धर्मप्रेम जागृत करणार्या घोषणा देणे’, यांचे महत्त्व लक्षात येते.
५. गुरुतत्त्वाने निर्गुण आणि समस्त देवतांनी सगुण अशा दोन्ही स्तरांवर या शंखनाद महोत्सवाला दैवी ऊर्जा प्रदान करून या यज्ञरूपी महोत्सवाची पूर्णाहुती करून घेणे
या कार्यक्रमाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून उपस्थित होते आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या स्थुलातून उपस्थित होत्या. त्यामुळे या तिन्ही मोक्षगुरूंच्या माध्यमातून कार्यरत झालेले गुरुतत्त्व हे निर्गुण स्तरावर कार्यक्रमाला दैवी ऊर्जा प्रदान करत होते. त्यामुळे रज-तमप्रधान वातावरणातही सत्त्वगुणाची वृद्धी होऊन हा संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात जेव्हा रज-तमप्रधान शक्ती अडथळा निर्माण करायला सरसावत होत्या, तेव्हा हिंदु धर्मातील विविध देवतांची सूक्ष्म रूपे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून प्रगट होऊन कार्यक्रमात दशदिशांनी येणारे अडथळे सगुण स्तरावर दूर करत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रगट झालेल्या विविध देवतांच्या एकत्रित शक्तीचे प्रतीक असणार्या सप्तरंगी इंद्रधनुष्यामुळे कार्यक्रमाच्या स्थानाभोवती संरक्षककवच निर्माण झाले होते. त्यामुळे कार्यक्रमात येणारे अडथळे दूर होऊन कार्यक्रमात खंड न पडता तो प्रभावीपणे पुढे चालू रहात होता. अशा प्रकारे ‘गुरुतत्त्वाने निर्गुण आणि समस्त देवतांनी सगुण अशा दोन्ही स्तरांवर या शंखनाद महोत्सवाला दैवी ऊर्जा प्रदान करून या यज्ञरूपी महोत्सवाची पूर्णाहुती करून घेतली.’ याबद्दल आम्ही सर्व साधक गुरुतत्त्व आणि समस्त देवता यांच्या प्रती कोटीशः कृतज्ञ आहोत.
६. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या तिन्ही घटकांचा सुरेख महासंगम झाल्याचे जाणवणे : कार्यक्रमातील वरील घटनांमधून उपस्थितांना पुढीलप्रमाणे लाभ झाल्याचे लक्षात आले.
अ. हिंदु धर्माचे रक्षण करण्याची आणि भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याची स्फूर्ती मिळाली.
आ. धर्महानी करणार्या घटकांशी प्रभावीपणे अन् शौर्याने संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली.
या महोत्सवात ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या तिन्ही घटकांचा सुरेख महासंगम झाल्याचे जाणवले.
७. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे अद्वितीयत्व
हा शंखनाद महोत्सव भारताची सुसंस्कृती आणि गौरवशाली इतिहास यांचा शंखनाद करणारा, रामराज्याच्या स्थापनेची घोषणा करणारा अन् दैवी ऊर्जा प्रक्षेपित करणारा होता. त्यामुळे हा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव अद्वितीय होता.
८. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची फलश्रुती
अ. या शंखनाद महोत्सवातून धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना धर्महानीच्या घटनांची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये धर्मजागृती झाली.
आ. त्यांना संत आणि विद्वान यांनी दिलेल्या धर्मज्ञानामुळे त्यांच्या धर्मज्ञानात वृद्धी झाली.
इ. संतांच्या प्रेरणादायी चैतन्यमय मार्गदर्शनामुळे त्यांना व्यष्टी स्तरावर धर्माचरण आणि साधना करण्याची, तसेच समष्टी स्तरावर धर्मसंस्थापनेच्या कार्यात पूर्ण क्षमतेने सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्याची प्रेरणा मिळाली.
ई. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त धर्मज्ञानाचे मंथन होऊन त्यातून रामराज्याच्या संकल्पनेला प्रत्यक्ष साकार करणारे धर्मामृत (धर्माचे अमृत) सर्व धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना प्राप्त झाले.
९. अनुभूती
या दोन दिवसांच्या शंखनाद महोत्सवाचे थेट प्रक्षेपण पहात असतांना ‘मी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी असून हा शंखनाद महोत्सव प्रत्यक्ष पहात आहे’, असे मला जाणवले. मला कार्यक्रमातून चैतन्यमय ऊर्जा प्राप्त होत असल्याचे जाणवले अन् माझी भावजागृती झाली.
१०. कृतज्ञता
‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे हा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वीरित्या आणि निर्विघ्नपणे पार पडला’, याबद्दल मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञतापुष्पे अर्पण करते.
जय सनातन, विजयी सनातन, सनातन धर्म महान !’
(समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १३ आणि १४ डिसेंबर २०२५, वेळ : सकाळी ११ ते रात्री ८.३५ आणि एकूण कालावधी: ९ घंटे ३५ मिनिटे)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !