TMC Leader Akhil Giri : (म्हणे) रामराज्याने पोट भरत नाही !

तृणमूल काँग्रेसचे नेते अखिल गिरी

कोलकाता (बंगाल) – राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांनी म्हटले, ‘बंगालमध्ये रामराज्याची काही आवश्यकता नाही. त्याने लोकांचे पोट भरत नाही. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले ‘रामराज्या’चे सूत्र राज्याच्या वास्तविक गरजांशी संबंधित नसल्याचेही त्यांनी नमूद केले. रामनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले गिरी यांनी राज्यात सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या तैनातीवरही आक्षेप घेतला. त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत ‘भाजप लाभासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे’, असे म्हटले आहे.

गिरी यांनी पुढे म्हटले की,

१. राज्यातील जनतेला विकास आणि कल्याण हवे आहे, धार्मिक घोषणांवर आधारित राजकारण नव्हे. त्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि बंगालमध्ये ‘ममताराज’ कायम राहील.

२. भाजप बंगालमध्ये आवश्यक नसलेली सूत्रे प्रचारात उपस्थित करत आहे. राज्यातील मुसलमान समाज पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्यासमवेत आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘रामराज्य काय होते ? आणि रामराज्य परत आल्यावर काय होऊ शकते ?’, हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी तृणमूलचे नेते अशी वक्तव्ये करून आणखी किती खालचा तळ गाठणार आहेत ? येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी तेथील हिंदु जनतेने पुढाकार घ्यावा !
  • भारतात शरीयतचे राज्य आणण्याची मनोकामना धर्मांध मुसलमान बाळगून आहेत. अशा वेळी ‘शरीयतचे राज्य आल्यास पोट भरणार नाही’, असे तृणमूलवाल्यांनी कधी म्हटले आहे का ?