‘अन्य दिवसांच्या तुलनेत अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना पुष्कळ अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतो. या दोन्ही तिथींच्या दिवशी साधना करणार्या व्यक्तींना देवता साहाय्य करतात का ?’, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर शोधण्यासाठी गणपति या देवतेविषयीचे संशोधन आपण २ एप्रिल या दिवशी पाहिले. आज दत्त आणि श्रीराम या देवतांविषयी पाहूया.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025115.html

१. अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण

१ अ २. दत्त
१ अ २ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी दत्तातील निर्गुण तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. त्याला अनुसरून पौर्णिमेच्या दिवशी दत्तातील भाव आणि आनंद ही दोन्ही स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली. तसेच दत्तातील मारक तत्त्वही ५ टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी गणपतीप्रमाणे दत्तातीलही निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, हे लक्षात आले.
१ अ २ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी दत्तातील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ते पौर्णिमेपेक्षा अधिक वाढले. अमावास्येच्या दिवशी दत्तातील भाव आणि आनंद यांची स्पंदने आणखी वाढली. तसेच दत्तातील मारक तत्त्वही पौर्णिमेपेक्षा अधिक वाढले. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी अधिक प्रमाणात असलेल्या अनिष्ट शक्तींच्या प्रभावाशी लढण्यासाठी दत्तातील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व अधिक प्रमाणात वाढते’, हे लक्षात येते.
१ अ ३. श्रीराम
१ अ ३ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी श्रीरामाच्या चित्रातील सगुण आणि निर्गुण तत्त्व अन्य दिवशी होते, तेवढेच राहिले; मात्र श्रीरामातील आध्यात्मिक भावाची स्पंदने १० टक्क्यांनी वाढली. तसेच पौर्णिमेच्या दिवशी श्रीरामातील तारक आणि मारक तत्त्व अन्य दिवशी होते, तेवढेच राहिले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी प्रभु श्रीराम आपल्यातील आध्यात्मिक भावाची स्पंदने वाढवून आपल्याला अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म स्तरावर लढायला साहाय्य करतो’, हे लक्षात आले.
१ अ ३ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी श्रीरामाच्या चित्रातील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. तेव्हा श्रीरामातील भाव आणि आनंद यांची स्पंदने वाढली. तसेच अमावास्येच्या दिवशी श्रीरामातील तारक तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. यावरून लक्षात येते, ‘अमावास्येच्या दिवशी अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी श्रीरामातील निर्गुण तत्त्व आणि तारक तत्त्व वाढते.’
(क्रमश:)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.३.२०२६)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025863.html
|
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !