नुकतीच २१ मार्च या दिवशी ईद साजरी झाली. त्या दिवशी जयपूर (राजस्थान), मालेगाव (महाराष्ट्र) आणि अलीगड (उत्तरप्रदेश) यांसारख्या अनेक शहरांमध्ये अत्यंत संतापजनक आणि विलोभनीय म्हणता येणार नाही, अशी दृश्ये पहायला मिळाली. सहस्रोंच्या संख्येने धर्मांध रस्त्यावर उतरले आणि त्यांनी भर रस्त्यात नमाजपठण केले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे,
अ. भारताच्या राज्यघटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे; पण ते दुसर्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी आहे का ?
आ. भर रस्त्यात नमाजपठण केल्यामुळे रुग्णवाहिका, वृद्ध नागरिक आणि कामावर जाणारे सामान्य लोक घंटोन्घंटे वाहतूक कोंडीत अडकतात.
हे पाहून प्रश्न पडतो की, आपण खरोखरच हिंदुबहुल हिंदुस्थानात आहोत कि पाकिस्तानात ? कारण असे दृश्य इस्लामी देशांमध्ये शोभून दिसले असते; पण निधर्मी भारतात कायद्याचा धाक उरला नाही का ? ‘सेक्युलॅरिझम’च्या (निधर्मीपणाच्या) नावाखाली रस्ते अडवून नमाजपठण, हे शक्तीप्रदर्शन कुणासाठी ?
१. मशिदींचे वाढते जाळे आणि तेथून होणारी विघातक कृत्ये
‘मशिदी नेमक्या कशासाठी आहेत ?’, हा प्रश्न आज प्रत्येक सजग हिंदूने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. मशिदींमधून केवळ प्रार्थना चालते कि हिंदूंच्या विरोधात कट रचले जातात ? याची सखोल चौकशी होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
अ. लव्ह जिहाद आणि धर्मांतर : गेल्याच महिन्यात उत्तरप्रदेशामध्ये ‘लव्ह जिहाद’चे मोठे प्रकरण उघड झाले. यात एका मौलानासह ३ जणांना अटक करण्यात आली. मशिदींचा वापर हिंदु मुलींना फसवण्यासाठी आणि त्यांचे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) करण्यासाठी केला जात असल्याचे पुरावे अनेकदा समोर आले आहेत.
आ. शस्त्रास्त्रांचा साठा आणि दगडफेक : २६ मार्च या दिवशी श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर मशिदीतून भीषण दगडफेक करण्यात आली. काचेच्या बाटल्या फेकल्या गेल्या. पोलीस संरक्षणार्थ तिथे उभे असतांनाही मशिदीतून दगड फेकण्यात आले. याचा अर्थ असा की, मशिदींमध्ये आधीच दगड आणि बाटल्या यांचा साठा करून ठेवला होता का ? जर मशिदी पवित्र आहेत, तर तिथे हे हिंसक साहित्य काय करत होते ? या प्रसंगावरून एक भाग लक्षात येतो की, त्रेतायुगात प्रभु श्रीरामाचे नाव घेतल्यानंतर राक्षस चवताळायचे तीच परिस्थिती आजही टिकून आहे.

२. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विद्रूपीकरण : गंगेत मांसाहार
हिंदु धर्म आणि संस्कृतीवर होणारे आघात केवळ भूमीवरच थांबलेले नाहीत, तर ते आता आपल्या पवित्र नद्यांपर्यंत पोचले आहेत. रोजा इफ्तार किंवा उपवास सोडण्याच्या नावाखाली काही धर्मांध प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गंगेच्या पात्रात नावेत बसून गेले. तिथे त्यांनी उघडपणे मांसाहार केला आणि मांसासह हाडे पवित्र गंगा नदीत फेकून दिली.
हिंदूंनो विचार करा, ‘जी गंगा आपल्यासाठी मोक्षदायिनी आहे, जिचे पाणी आपण भरून आणून देवघरात पूजतो, मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मुखात गंगा नदीचे जल देतो… त्या नदीमध्ये हे कृत्य करण्याचे धाडस धर्मांधांना होते कसे ? अशा प्रकारची कृत्ये हे लोक त्यांच्या मशिदीत का करत नाहीत ? हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडवण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलेले कारस्थान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
३. पोलीस प्रशासन आणि सरकारी यंत्रणा यांची दुटप्पी भूमिका
सर्वांत वेदनादायी, म्हणजे पोलीस प्रशासनाचे वागणे. जेव्हा सहस्रो धर्मांध रस्ते अडवून नमाजपठण करतात, तेव्हा पोलीस हतबल होऊन केवळ बघत रहातात. त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नाही, त्यांच्यावर गुन्हे नोंद होत नाहीत; परंतु जेव्हा हिंदू एकत्र येतात, तेव्हा मात्र कायद्याचा बडगा उगारला जातो.
याविषयी आलेला एक अनुभव येथे देत आहे. नुकतीच कोल्हापूरमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या आदल्या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘वाहन फेरी’चे नियोजन केले होते. या फेरीसाठी ४ दिवस आधी लेखी अर्ज देऊन अनुमती मागितली होती. प्रशासन ४ दिवस ‘देतो, बघतो’, अशा उत्तरांनी हिंदूंना झुलवत ठेवले. अखेर वाहन फेरीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ‘अनुमती नाकारली’, असे सांगण्यात आले.
स्वतःच्या देशात हिंदूंना रॅली काढण्यासाठी आणि सण साजरे करण्यासाठी पोलिसांचे हातपाय जोडावे लागतात अन् धर्मांधांना मात्र रस्ते मोकळे करून दिले जातात. हा अन्याय नाही का ?
४. स्वातंत्र्याचा ‘अमृतकाळ’ कि हिंदूंची ‘गळचेपी’ ?
स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही जर हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक होत असेल आणि मशिदींमधून गरळओक केली जात असेल, तर मग आपण नक्की काय मिळवले ? आजही आपल्या देशावर ‘गांधीवादाचे भूत’ स्वार आहे. ‘अहिंसा’ केवळ हिंदूंनीच पाळायची आणि दुसर्या बाजूने मात्र सतत हिंसक आक्रमणे होत रहायची, हा कुठला न्याय ? अल्पसंख्यांकांचे लाड पुरवण्याच्या नादात बहुसंख्यांक हिंदु समाजाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे.
५. आता वेळ आली आहे सखोल चौकशीची आणि कारवाईच्या मागणीची !
मशिदींमध्ये नमाजपठणाच्या व्यतिरिक्त काय चालते ? तिथे कुणाला आश्रय दिला जातो ? तिथून हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक कशी होते, या सगळ्याची उच्चस्तरीय सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
जर रस्ते नमाजासाठी वापरायचे असतील, तर या अवाढव्य मशिदींचा उपयोग काय ? जर मशिदींमधून गुन्हेगारांना आणि लव्ह जिहाद्यांना संरक्षण मिळत असेल ? तर अशा प्रार्थनास्थळांवर शासनाने टाच आणली पाहिजे.
आता शांत बसून चालणार नाही. आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठवणे आणि आपल्या हक्काचा ‘हिंदुस्थान’ टिकवणे, हेच आपले आद्यकर्तव्य आहे. जर आज आपण जागृत झालो नाही, तर उद्याचे भवितव्य अंधकारमय असेल.
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– कु. पार्थ सुनील घनवट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०२६)

तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !