|

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील खलिस्तानी संघटनांनी ५ एप्रिल २०२६ या दिवशी ब्रॅम्प्टन येथील त्रिवेणी मंदिर आणि सरे येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर या २ मोठ्या हिंदु मंदिरांबाहेर ‘खलिस्तान झिंदाबाद’ मोर्चा काढण्याची अन् निदर्शने करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘हिंदु जेव्हा पूजा करण्यासाठी या मंदिरांमध्ये येतील, तेव्हा त्यांना घोषणा ऐकाव्या लागतील, धक्काबुक्की होऊ शकते.’ यावर ‘हिंदु कॅनेडियन फाऊंडेशन’ने तात्काळ निवेदन प्रसारित करत म्हटले की, आमची मंदिरे पूजेची पवित्र स्थळे आहेत, ती निदर्शनांची मैदाने नाहीत. आम्ही धमक्यांपुढे झुकणार नाही. संपूर्ण कॅनडातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा यांना चेतावणी देतांना फाऊंडेशनने म्हटले आहे की, या आतंकवाद्यांना थांबवा, अन्यथा हिंदु समुदायाचा कॅनडाच्या पोलीस आणि सरकार यांवरील विश्वास उडेल.
खलिस्तान समर्थकांनी कॅनडामध्ये यापूर्वीही मंदिरांबाहेर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.
🚨 Canada On Edge: Khalistani Threats Target Hindu Temples 🚨
Khalistan extremists have openly threatened to protest outside 2 Hindu temples on April 5, raising serious concerns over safety and law & order in Canada 🇨🇦
The @officialHinduCF has issued a strong warning:
👉 “We… pic.twitter.com/YQbIinrsgM— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 31, 2026
‘हिंदु कॅनेडियन फाऊंडेशन’चे म्हणणे आहे की,
१. हा कोणताही शांततापूर्ण विरोध नसून वातावरण जाणूनबुजून भडकवण्याचा कट आहे. मंदिराला राजकीय व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी ३ नोव्हेंबर २०२४ दिवशी ब्रॅम्प्टन येथील हिंदु सभा मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी दिवसाढवळ्या आक्रमण केले होते. महिला, मुले आणि वृद्ध यांच्यावर काठ्या चालवल्या होत्या. हे त्यांनी केवळ यासाठी केले की, या महिला वगैरे तेथे शांततेत पूजा करत होत्या. हे एकच आक्रमण नाही, तर अनेक मंदिरांना सतत लक्ष्य केले जात आहे. भक्तांना घाबरवले जात आहे.
२. आमची मंदिरे पवित्र आहेत. ही विरोध प्रदर्शनाची स्थळे नाहीत, तसेच राजकीय व्यासपिठेही नाहीत. जर या वेळी काही गडबड झाली, तर आम्ही गप्प बसणार नाही.
३. हिंदु समुदाय कॅनडाचा अविभाज्य भाग आहे. हिंदू शांतताप्रिय आहेत. लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे; पण आता फार झाले. सरकारने हिंदूंच्या सुरक्षेची निश्चिती करावी.
४. कॅनडाच्या संसदेने आधीच ‘सी-९’ विधेयक संमत केले आहे. यात प्रार्थनास्थळांवर द्वेष, धमकी आणि अडथळा निर्माण करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद आहे. ब्रॅम्प्टनमध्ये आधीच मंदिरांच्या आसपास ‘बबल झोन’ सिद्ध केले आहेत, जिथे निदर्शने करण्यास मनाई आहे. लक्ष्य करणे हा कोणताही निषेध नाही, ही धमकी आहे. पूजेत अडथळा आणणे हे कोणतेही मुक्त भाषण नाही, ही जबरदस्ती आहे.
५. खलिस्तान समर्थक हिंदु समुदायाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे केवळ हिंदूंसाठीचे सूत्र नाही, तर संपूर्ण कॅनडाच्या सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा यांसाठी धोका आहे. कॅनडा-आधारित खलिस्तानी आतंकवादी देशांतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका बनले आहेत.जे लोक हिंसा भडकवतात, त्यांची ओळख पटवून दायित्व निश्चित केले जावे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी