Manchar Pune Land Jihad : मंचर (पुणे) येथील ऐतिहासिक ‘बारव’वरील वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद अंततः रहित !

हिंदूंच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय !

(बारव म्हणजे शिवकालीन विहीर. तिचा आकार चौकोनी, आयाताकृती असतो.)

पुणे – मंचर येथील १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘बारव’ !

पुणे – मंचर (तालुका आंबेगाव) येथील १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘बारव’ आणि परिसर यांवर करण्यात आलेली वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद महसूल विभागाने अंततः रहित केली. आपल्या प्राचीन सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि जागरूक नागरिक यांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर प्रशासनाला ही अनधिकृत नोंद हटवावी लागली.

‘हा निर्णय केवळ कायदेशीर विजय नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे’, असे भाजपच्या उद्योग आघाडीचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद बाणखेले यांनी मंचर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुका माजी अध्यक्ष संदीप बाणखेले, महेश पिंगळे, गणेश बाणखेले, चैतन्य महाजन आदींसह विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सविस्तर वृत्त वाचा → Manchar Pune Land Jihad : मंचर (जिल्हा पुणे) येथील पांडवकालीन बारव परिसरात धर्मांधांचे अतिक्रमण

काही दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी बारवच्या ठिकाणी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले होते.

सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करणारा विजय !

मंचर जवळच्या निघोटवाडी ग्रामपंचायत सीमेतील अनुमाने ४ एकर क्षेत्रावर अतिक्रमण झाले होते. या ऐतिहासिक जागेवर वक्फ बोर्डाचे नाव अवैधपणे लावण्यात आले होते. ही जागा पुन्हा सरकारी मालकीची होऊन तिचे ऐतिहासिक स्वरूप जपावे, अशी मागणी प्रमोद बाणखेले आणि स्थानिक हिंदू यांनी सातत्याने केली होती. या संघर्षाला यश आले असून आता ही भूमी पुन्हा सरकारी ७/१२ उतार्‍यावर नोंदवण्यात आली आहे.

मंचरच्या ऐतिहासिक बारववरचा वक्फ दावा रद्द | संस्कृतीला मिळाला न्याय!#news #mharashtra #viral #likes
(सौजन्य : pune prime news 24)

संघर्षाचे महत्त्वाचे पैलू

१. ४ एकर क्षेत्रातील अतिक्रमण हटवून वक्फ बोर्डाचे अनधिकृत नाव काढण्यात आले आहे.

२. ऐतिहासिक बारव आणि तेथील शिलालेख यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ही जागा पुरातत्व खात्याकडे वर्ग करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे.

ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी हिंदु समाजाने सजग रहावे ! – प्रमोद बाणखेले

श्री. प्रमोद बाणखेले

याविषयी श्री. प्रमोद बाणखेले म्हणाले,

‘‘हा विजय आपला इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. भविष्यातही अशा ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी हिंदु समाजाने सजग रहाणे काळाची आवश्यकता आहे.’’

संपादकीय भूमिका

बारवच्या मुक्ततेवरून हिंदूंनी समाधान न मानता प्रत्येक हिंदु मंदिर, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळावरील अतिक्रमण काढेपर्यंत प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.