Bengal Shriram Navami Violence : बंगालमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानांकडून आक्रमण !

मुर्शिदाबाद आणि पुरुलिया येथे जाळपोळ अन् तोडफोड करत भगवे ध्वज काढून फेकले

मुर्शिदाबाद (बंगाल) – मुर्शिदाबाद आणि पुरुलिया येथे श्रीरामनवमीनिमित्त २७ मार्च या दिवशी संध्याकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून तोडफोड आणि जाळपोळ केली. यामध्ये अनेक जण घायाळ झाले.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडक कृती दल (रॅपिड ॲक्शन फोर्स) आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपमहानिरीक्षक अजित सिंह यादव यांनी सांगितले की, अनेक दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

१. मुर्शिदाबादमधील जंगीपूरमध्ये मिरवणूक ‘मॅकेन्जी पार्क’वरून निघून फुलतला मोड येथे पोचली असता मुसलमानांनी त्यावर वीट आणि दगड फेकले. हे आक्रमण नियोजित होते. असाच हिंसक प्रकार पुरुलियाच्या पारा भागातही घडला. तेथे शांततेत निघणार्‍या मिरवणुकीला धर्मांध मुसलमानांनी लक्ष्य केले. या आक्रमणांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहेत.

२. भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या दाव्यानुसार मुसलमानांनी पवित्र भगवा ध्वज अवमानकारक पद्धतीने खाली खेचून फेकून दिला. हा केवळ धर्माचा अपमान नसून सनातनी लोकांच्या भावनांवर थेट आघात आहे. रस्त्यांवर झालेल्या या घटनेमुळे लोकांना जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. आपल्याच राज्यात भगवा ध्वज फडकवणे, हा गुन्हा आहे का ?

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यात तेथील हिंदूंनी हिंदूंच्या रक्षणासाठी आता तरी कृतीशील होऊन मतदान करणे आवश्यक आहे !