प्रभु श्रीराम आणि माता कौसल्या यांचा अवमान केल्याचे प्रकरण

हरदोही (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे नेते यदुनंदन लाल वर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर भगवान श्रीराम आणि माता कौसल्या यांच्याविषयी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदु संघटनांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारींची नोंद घेत पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. हे विधान नेमके काय होते ?, ते समजू शकले नाही.
१. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शराफत अली यांनी वर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यदुनंदन लाल वर्मा यांची पक्षाची प्राथमिक सदस्यता रहित करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
२. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, धार्मिक सलोखा बिघडवण्याची अनुमती कुणालाही दिली जाणार नाही. सध्या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषण अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
#UPPolice
थाना हरपालपुर पुलिस द्वारा मु0अ0सं0 81/26 धारा 299/196 बीएनएस व 67 आईटी एक्ट से संबंधित वांछित अभियुक्त को गिरफ्तार करने के संबंध में-#HardoiPolice pic.twitter.com/SbssTRICUI— Hardoi Police (@hardoipolice) March 27, 2026
(ही छायाचित्रे / व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकासमाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष ! अशा पक्षांची मान्यताच रहित केली पाहिजे ! |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ