
हिंदू सोडून अन्य कुणालाही देवस्थानाच्या यात्रांमध्ये प्रवेश देण्यात न येण्यासाठी प्रयत्न करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावाचे सरपंच आणि ‘श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. संजय मरकड यांचा, तसेच शनिशिंगणापूर येथील श्री. ऋषिकेश शेटे यांचा शनिशिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचार उघड केल्याविषयी विशेष सत्कार करण्यात आला.

या संदर्भात मनोगत व्यक्त करतांना श्री. संजय मरकड म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराज हे ‘श्रीमंत राजयोगी’ होते. या संस्थानकडे अनुमाने ८ सहस्र एकर भूमी होती. त्यातील १ सहस्र २५० एकर भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला असून मंदिराच्या जागेवरही मुसलमानांनी अधिकार सांगितला आहे. मी मंदिराचा अध्यक्ष झाल्यानंतर मुसलमानांकडून होणारी पशूहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. याला पहिल्या वर्षी ४० टक्के, दुसर्या वर्षी ७० टक्के आणि तिसर्या वर्षी ९० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद लाभला. या वेळी माझ्या लक्षात आले की, आपल्यातीलच काही मुसलमानप्रेमींकडून मला विरोध होत आहे. यानंतर मी सरपंच झाल्यावर ग्रामसभेचा ठराव घेतला आणि मुसलमान व्यापार्यांना मंदिराच्या यात्रेमध्ये विक्रीची दुकाने थाटण्यासाठी प्रतिबंध केला. याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळाला. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला. त्यांनीही माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला. यात्राकाळात ८ दिवसांत २० ते २५ लाख भाविक श्री क्षेत्र मढी येथे दर्शनासाठी येतात. आता यात्रेमध्ये व्यापारीच काय, तर उपाहारगृहातील कामगारही मुसलमान दिसणार नाहीत.
गेल्या मंदिर परिषदेनंतर ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर येथे १०० वर्षांनंतर पहिल्यांदाच सामूहिक आरती चालू केली. आमच्या मंदिरात दासबोध, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन नित्य होते, तसेच बालसंस्कारवर्ग चालू केले ! या परिषदेतून मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि कायदेशीर गोष्टींचे मार्गदर्शन मिळाले.
– श्री. भगवंतराव जांभळे, विश्वस्त, दत्त मंदिर, जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर)
ग्रामसभेने केलेला ठराव हा जिल्हाधिकार्यांनाही मानावाच लागतो; कारण त्याचे तात्काळ कायद्यात रूपांतर होते. त्यामुळे मंदिर हिताचे कायदे गावागावांमध्ये होणे आवश्यक आहे. यासाठी आपणाला जे काही साहाय्य लागेल, ते मी स्वतः स्वखर्चाने आपल्या ठिकाणी येऊन करण्यास सिद्ध आहे.
– श्री. संजय बाजीराव मरकड
मंदिर विश्वस्तांना कायदेशीर मार्गदर्शन !

मंदिर परिषदेच्या २ चर्चासत्रांमध्ये मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी यांनी त्यांच्या देवस्थानाच्या संबंधित कायदेशीर प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना अधिवक्ता जनार्दन करपे, अधिवक्ता सोमनाथ भरमगुंडे, श्री. अनुप जयस्वाल, माजी सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, तसेच हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. या प्रसंगी विचारलेले काही सामायिक प्रश्न आणि सर्वांना उपयुक्त ठरतील अशी त्याची उत्तरे खालीलप्रकारे आहेत.
१. प्रत्येक ३ वर्षांनी विश्वस्त नोंदणी करण्याविषयी जो व्यय येतो, तो टाळण्यासाठी उपाय म्हणजे विश्वस्त नोंदणी करण्याचे आवेदन स्वतः भरू शकतो. त्यासाठीची प्रक्रिया शिकून घ्यावी. त्याला वैयक्तिक अधिवक्ता नियुक्त करण्याची आवश्यकता नाही.
२. शासकीय भूमीवर विनाअनुमती मंदिर बांधले असल्यास त्याची नोंदणी करण्यासाठी शासकीय खात्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे आवश्यक आहे. प्रमाणित नकाशा प्रत आणि अन्य कागदपत्रे यांसाठी आवश्यक आहेत.
३. मंदिरे नोंदणीकृत न केल्यास कालांतराने अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मंदिरे प्रथम नोंदणीकृत करून घ्यावीत. नोंदणी करण्यात दिरंगाई झाली असल्यास धर्मादाय आयुक्तांना ‘नोंदणी झाली नसलेले मंदिर आहे’, असे कळवणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्याविना वर्गणी गोळा करू नये; अन्यथा कायदेशीर अडचणी येऊ शकतात.
४. मंदिर परिसरातील मद्य-मांसाची दुकाने बंद करण्यासाठी निवेदन देऊन शासनाकडून त्या संदर्भात कारवाईसाठी मागणी केली जाऊ शकते. अशा पद्धतीचे कायदे सध्याच्या घटनेमध्ये केले आहेत. याचा आधार घेऊन हे करता येते.
५. देवस्थानाची भूमी १० वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वाने वापरण्यासाठी देऊ शकतो. त्या भूमीवर शेती करून ते उत्पन्न देवस्थानासाठी वापरता येऊ शकते.
६. पुजार्याचे आकस्मिक निधन झाले किंवा अपघात झाला, तर मंदिर न्यासाच्या वतीने साहाय्य करू शकतो.

श्री. ऋषिकेश शेटे म्हणाले ‘‘केवळ ५-१० घरे गावात असूनसुद्धा गावात मशिदी मोठ्या प्रमाणावर उभ्या केल्या जातात. अशी परिस्थिती अनेक गावांत निर्माण झाली आहे. भ्रष्टाचारी, तथाकथित निधर्मी लोकप्रतिनिधी यांनी जिहाद्यांना सवलत दिली आहे. असाच प्रकार शनिशिंगणापूर देवस्थानाच्या संदर्भात घडला. तेथील एका लोकप्रतिनिधीने देवस्थानात ११४ मुसलमान कर्मचारी नेमले होते. त्यांना ४५ सहस्र रुपये वेतन मिळत होते. या संदर्भात तक्रार प्रविष्ट करून आंदोलन करण्यात आले. यानंतर सर्वांना काढून टाकण्यात आले. देवस्थानाची निविदा मुसलमानांना देऊन मंदिरातील साहित्य, तसेच भाजीपाला त्यांच्याकडून खरेदी केला जात होता. येथील महादेव मंदिर आणि त्या मंदिराची ५२ एकर भूमी शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांनी संगनमत करून एका पुढार्याला दिली.’’
या वेळी ‘संस्थान ट्रस्ट चालवतांना’, हे पुस्तक लिहिणारे एन्.ए. कदम यांचा श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उठा बांधवांनो, हा लढा आता लढूया । मंदिरांच्या मुक्ततेचा इतिहास घडवूया ।।


श्री रेवणसिद्ध देवाने कौल दिल्याप्रमाणे १ सहस्र १०० हून अधिक उपस्थिती

विटा (जिल्हा सांगली) येथून १० किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र रेणावी हे गाव आहे. नवनाथांपैकी श्री रेवणनाथ यांचे येथे वास्तव्य होते. येथे त्यांचे भव्य, प्राचीन मंदिर आहे. चतुर्थ मंदिर न्यास परिषदेच्या निमित्ताने येथील भक्तनिवासात परिसरातील मंदिर विश्वस्तांची बैठक आयोजित केली होती. या मंदिराच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. बालाजी गुरव आणि त्यांचे सहकारी यांनी हे आयोजन केले होते. बैठकीला मंदिर महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. संजय जोशी यांच्या समवेत खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान, विटा येथील मन्मथ मंदिर, काळम्मा मंदिर, श्रीराममंदिर आणि गोडाचीवाडी येथील गुरु भगवान दत्तात्रय मंदिर यांचे विश्वस्त उपस्थित होते. या वेळी उपस्थित विश्वस्तांसमवेत श्री रेवणसिद्ध देवाच्या चरणी साकडे घालून परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. या मंदिरात मूर्तीसमोर एक ‘गुंड’ (गोलाकार दगड) आहे, येथे कौल लावला जातो. एरवी सहज उचलता येणारी ही ‘गुंड’ देवाने कौल दिल्यानंतर जागेवरून हलत नाही. दर्शनाच्या वेळी आम्ही उपस्थितीविषयी देवाला कौल मागितला. तेव्हा ‘१००० हून अधिक उपस्थिती राहील’, असा देवाने आम्हाला कौल दिला. प्रत्यक्षातही १ सहस्र १०० हून अधिक मंदिर विश्वस्त परिषदेला उपस्थित राहिले.
श्री रेवणसिद्ध देवाने एकप्रकारे कार्याला भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !
– श्री. राहुल कदम, विटा, जिल्हा सांगली.
चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ला विविध मार्गांनी सहकार्य करणार्यांचे आभार !
श्री समर्थ संस्थान, श्री समर्थ रामदासस्वामी संस्थान, करंजे येथील श्री भैरवनाथ मंदिर, पंचपाळी हौद श्री दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री शनिमारुति मंदिर, स्वराज मंगल कार्यालय, श्री दत्तसंस्थान अक्कलकोट स्वामीभक्त परिवार, श्री जीवदानीदेवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री सत्यसाई सेवा समिती, श्री जरंडेश्वर मंदिर देवस्थान,
श्री. काळे महाराज, तसेच श्री. सौरभ पोतेकर, श्री. मनोज शेंडे, श्री. विशाल देशपांडे, श्री. शीतल शिंदे
अन्य घडामोडी

मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांचा फलटण येथील बालाजी मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य संघटक श्री. संजय जोशी यांचा सत्कार सज्जनगड येथील ‘श्री रामदासस्वामी संस्थान’चे व्यवस्थापक श्री. उदय रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
१७ सहस्र मंदिरांचे संघटन हा केवळ प्रारंभ आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून चालू झालेले हे कार्य आता रस्त्यावरील संघर्षापर्यंत पोचले आहे.
– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !