हे धर्मांधांच्या ‘जिहाद’चेच रूप असल्याने राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार ! – मंत्री नितेश राणे

मालेगाव (जिल्हा नाशिक) – मालेगाव महानगरपालिकेत मुसलमान संघटनेच्या सदस्यांनी २४ फेब्रुवारीला दुपारी नमाजपठण केले. या घटनेवरून विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यघटनेच्या कुठल्या पानावर महानगरपालिकेत नमाजपठण करण्याची अनुमती आहे, याचे कागद त्यांनी मला दाखवावेत. हे धर्मांधांच्या ‘जिहाद’चेच रूप आहे. मदरशांमध्ये कधी शस्त्रास्त्रे सापडतात, तर कधी मुलांचे शोषण होते. मशिदीत कुराण शिकवा; पण धर्मांधतेचे धडे देणारे स्वतंत्र मदरसे कशाला हवेत ? महाराष्ट्रातील सर्व मदरसे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
(म्हणे) ‘रमझान चालू असल्याने नमाजपठणाची वेळ झाल्याने केले नमाजपठण !’ – मुसलमान संघटनेचे स्पष्टीकरण
या प्रकरणी स्पष्टीकरण देतांना मुसलमानांनी सांगितले की, लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी प्रभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याविषयी महानगरपालिकेकडे निवेदन दिले; मात्र त्याची नोंद घेतली न गेल्याने प्रभागातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या विद्युत् विभागात ठिय्या आंदोलन केले. या संदर्भात अधिकार्यांनी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित केली होती; मात्र संबंधित अधिकारी बैठकीला आलेच नाहीत. रमझानचा महिना चालू असल्याने सायंकाळच्या नमाजपठणाची वेळ झाली. ‘आम्ही कार्यालयातून बाहेर पडलो असतो, तर आमची समस्या प्रलंबितच राहिली असती आणि अधिकारीही निघून गेले असते. त्यामुळे आम्ही विद्युत् विभागाच्या कार्यालयातच नमाजपठण केले’, असे त्यांनी सांगितले.
-
मंत्री नितेश राणे यांनी केलेली टीका
-
महानगरपालिकेत ‘भगवद्गीता’ वाचायला प्रारंभ केल्यास मुसलमानांनी गप्प बसावे ! – नितेश राणे
मंत्री श्री. नितेश राणे पुढे म्हणाले की,
महानगरपालिकेत तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेला आहात कि इस्लामचा प्रसार करण्यासाठी ? नमाजपठण करण्यासाठी मशिदींना काय टाळे ठोकले आहेत का ? हा ‘जिहाद’ नाही, तर काय आहे ? जर उद्या आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत ‘भगवद्गीता’ वाचायला प्रारंभ केला, तर या ‘हिरव्या सापां’नी (धर्मांधांनी) तोंड उघडू नये. तुम्ही नमाजपठण केले, तर चालते; पण हिंदूंनी काही केले की, लगेच हिंदू-मुसलमान वाद उकरून काढला जातो.
“This is nothing but ‘Jihad’.” ⚡
Maharashtra minister @NiteshNRane slams the offering of Namaz at the Malegaon Municipal Corporation.
He is now set to demand a total ban on madrasas across Maharashtra. 🚩🗞️#MaharashtraNews #Malegaon #NiteshRane #PoliticsUpdate
🎥 Courtesy:… pic.twitter.com/qpdZW0X8ns— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 25, 2026
मदरसे म्हणजे आतंकवादाचे अड्डे !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मदरशात लहान मुलांना मारहाण झाल्याचे उघड झाले. मदरसे हे केवळ आतंकवादाचे अड्डे असून तिथे देशविरोधी कृत्येही केली जातात. इस्लामी देशांमध्ये कुणी ‘भगवद्गीता’ शिकवण्याची अनुमती देईल का ? मग आम्हीच मदरशांचे लाड का करायचे ?
निवडणुकीच्या पूर्वी ‘जय भीम-जय मीम’च्या (‘दलित आणि मुसलमान समाजाच्या ऐक्याच्या) वल्गना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात आणि केवळ ‘जय मीम’च उरते.
धर्मांधांना धडा शिकवणार !
मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यांना (मदरशात मुलांना मारहाण करणार्या मुल्ला-मौलवींना) असा काही धडा शिकवीन की, पुन्हा हात उचलण्यापूर्वी ते १० वेळा विचार करतील. हे जिहादी मानसिकतेचे लोक केवळ हिंसाच जाणतात.
संपादकीय भूमिकामालेगावमध्ये इस्लाम पार्टीची सत्ता आल्यानंतर याहून वेगळे काय घडणार ? या घटनेतून देशातील हिंदूंना आतातरी हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? हे लक्षात येईल का ? |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !