Karnataka Stone Pelting : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन

बागलकोटे (कर्नाटक) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक केल्याचे प्रकरण

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बागलकोटे (कर्नाटक) – १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर शहरातील मशिदीतून दगडफेक करण्यात आली. या घटनेचा कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र निषेध केला आहे. राज्यातील जनतेने शांतता आणि सलोखा राखावा, असे आवाहन त्यांनी ‘एक्स’वरून केले आहे. ‘या घटनेचे निःपक्षपाती अन्वेषण करून या दुष्कृत्यात सामील असलेल्या समाजकंटकांना कायद्यानुसार चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मी पोलीस अधिकार्‍यांना दिली आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या या दगडफेकीच्या घटनेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी  दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (हिंदूंनी संघटन शक्ती दाखवल्यास धर्मांधांना अशाप्रकारे आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे हिंदूसंघटन हीच काळाची खरी गरज ठरली आहे ! – संपादक) या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती बागलकोटे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी दिली आहे.

शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक हे देशद्रोही कृत्य !  – प्रमोद मुतालिक

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक

बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या  मिरवणुकीवर बागलकोटेमधील किल्ला ओणी भागात मशिदीतून झालेल्या दगडफेकीवर श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक करणे, हे देशद्रोही कृत्य आहे’, असे मुतालिक यांनी म्हटले आहे.  या घटनेत पोलीस अधिकारी घायाळ झाले होते. मिरवणुकीवर दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मुतालिक यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

मुख्यमंत्री जरी म्हणत असले, तरी कर्नाटकात काँग्रेसचे, म्हणजे मोगलांच्या वंशजांचे राज्य असल्याने तेथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच आहे ! संतप्त हिंदूंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री अशी फुकाची आश्वासने देत आहेत !